PUBG Mobile गेम डेव्हलप करणारी कंपनी Tencent Games आणि PUBG Corp ने स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo सोबत Oppo PUBG Mobile India Tour 2019 नावाने एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा भारतातील चार शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यात जयपूर, गुवाहाटी, पुणे आणि विशाखापट्टनम (Visakhapatnam) शहरांचा समावेश आहे. ही स्पर्धा आजपासून म्हणजेच 1 जुलै 2019 पासून सुरु होत असून पुढील चार महिने चालणार आहे. यात विविध सामने खेळले जाणार आहेत.
Oppo PUBG Mobile India Tour 2019 स्पर्धेचा ग्रँड फिनाले कोलकाता येथे 20 ऑक्टोबर 2019 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. जाणून घ्या स्पर्धेचे शेड्यूल, प्राइज मनी आणि इतर माहिती.
PUBG Mobile बनवणारी कंपनी Tencent Games आणि PUBG Corp ने या वेळी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo सोबत एक करार केला आहे. Oppo प्लेयर्स ना एनकरेज करण्यासाठी नुकताच लॉन्च झालेला स्मार्टफोन Oppo F11 Pro सोबत ‘Be The Pro With The F11 Pro’ मोमेंट शेअर केले जाईल. या स्मार्टफोनचे फिचर्स पुढील प्रमाणे.
स्मार्टफोनचे फिचर्स
- डिस्प्ले- 6.5 इंच
- स्क्रीन-टू-बॉडी रेशो - 90.9 %
- चार्जिंग सपोर्ट - VOOC 3.0 फास्ट चार्जिंग
- 70 प्रोसेसर - Mediatek Helio P70 हाइपरबूस्ट फीचरसह ( RAM ऑप्टिमाइज करणारा ज्यामुळे गेम कमी वेळात लोड होतो. तसेच, प्लेयर्सला चिकन डिनर जिंकण्याची संधी मिळते. )
खेळाडूंसाठी भौगोलिक सीमा नाही
Oppo PUBG Mobile India Tour 2019 स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की, या स्पर्धेत केवळ भारतीय खेळाडूच सहभागी होऊ शकतात आणि त्यांच्यासाठी ही खुली स्पर्धा असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडे टीयर प्रीमियम 5 PUBG अकाऊंट असणे गरजेचे आहे. किंवा प्लेयरने लेवल 20 क्वालिफाय करणे महत्त्वाचे आहे. ही स्पर्धात प्रदेशानुसार खेळली जाईल. खेळाडूला वर दिलेल्या (जयपूर, गुवाहाटी, पुणे आणि विशाखापट्टनम ) शहरांपैकी एकाची निवड करावी लागेल. शहर निवडीसाठी खेळाडूला भौगोलिक सीमा मर्यादा नाही. म्हणजेच दिल्लीचा स्पर्धक मुंबई येथून तर, मुंबईतील स्पर्धक विशाखापट्टनम येथून स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
या स्पर्धेत खेळण्यासाठी प्लेयर्सला स्कवॉड ऑनली फॉर्मेटच्या माध्यमातून खेळावे लागेल. यात प्लेयर्स गेमच्या चारी दिशांनी वेगवेगळ्या राऊडमध्ये खेळू शकतील. फअलेइंग फिल्ड योग्य ठेवण्यासाठी राऊडला फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन प्रसपेक्टिल मॉडेल प्रमाणे मिक्स केले जाईल.यात विविध क्षमतेच्या खेळाडूंना एकोमोडेट केले जाईल. PUBG Mobile साठी गेम कंट्रोलर अमॅझॉन वरुन खरेदी करता येऊ शकेल. (हेही वाचा, पबजी गेम खेळताना अडविले, बायकोची नवऱ्याकडे घटस्फोटाची मागणी)
Oppo PUBG Mobile India Tour 2019 एकूण 6 टप्प्यांत पार पडेल. सर्वात पहिला टप्पा हा रजिस्ट्रेशन फेजचा असेल. यात प्रत्येक ग्रुपमध्ये एण्ट्री करणाऱ्या प्लेयर्सला रजिस्ट्रेशन करावे लागेल. ग्रुप ए म्हणजेच जयपूरचे रजिस्ट्रेशन 1 जुलै ते 14 जुलै दरम्यान केले जाईल. ग्रुप-बी म्हणजेच गुवाहाटी साठी 1 जुलै ते 28 जुलै, ग्रुप सी म्हणजेच पुणे 1 जुलै ते 11 ऑगस्ट, ग्रुप - डी म्हणजेच विशाखापट्टनम साठी 1 जुलै ते 25 ऑगस्ट या काळात रजिस्ट्रेशन करता येणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी कोणतीही मर्यादा नाही.