PUBG (Photo Credit: File Photo)

पबजी मोबाईल (PUBG Mobile) आणि पबजी मोबाईल लाइट  PUBG Mobile Light) आजपासून (30 ऑक्टोंबर) भारतात पूर्णपणे आपले काम करणे बंद करणार आहे. म्हणजेच भारतीय युजर्ससाठी आजपासून पबजी गेम बंद होणार आहे. कंपनीने गुरुवारी एका फेसबूक पोस्टच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली. भारतात एका महिन्यापूर्वी जवळजवळ 118 अॅपवर सरकारकडून बंदी घालण्यात आली. त्यामध्ये पबजी गेमचा सुद्धा समावेश होता. भारत सरकारने हे अॅप बंद करण्यामागील कारण स्पष्ट करत असे म्हटले होते की, चीन पासून आपल्याला धोका आहे. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली होती जेव्हा पबजी मोबाईलचे डेव्हलपर पबजी कॉर्पने लिंक्डइनवर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, भारतात बॅटल रॉयल-स्टाइव गेम्स भारतात पुन्हा येण्याची शक्यता आहे.

मोबाईल गेमचे सर्वस्वी मालकी हक्क असलेल्या Tencent Games यांनी फेसबुकवर एका पोस्टमध्ये असे म्हटले होते की, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. त्याचसोबत त्यांनी भारतात पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइटच्या युजर्सचे समर्थन करण्यासाठी त्यांचे आभार सुद्धा मानले होते. कंपनीने हे सुद्धा म्हटले की, युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणे ही आमची प्राथमिकता होती. त्यांनी नेहमीच डेटा सुरक्षिततेसंबंधित नियम आणि अटींचे पालन केले आहे. तर टेंसेंट पबजी मोबाईलचे डेव्हलपर पबजी कॉर्पोरेशनला सर्व अधिकार देत आहे. जी क्राफ्ट्स गेम युनियन कंपनीचे आहेत.(PUBG गेमच्या नव्या अपडेटनंतर भारतीय गेमर्सची नाचक्की; गेमचे Updated Version डाऊनलोड करणे अशक्य)

पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइट यांच्यावर जेव्हा बंदी घालण्यात आली त्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी चीनच्या या टेक कंपनीची मार्केट वॅल्यूमध्ये जवळजवळ 34 अरब डॉलरची घट झाली. टेंसेंट PUBG गेमिंग अॅपच्या माध्यमातून भारतात सर्वाधिक कमाई करत होता. प्रतिदिनी या गेमसाठी तब्बल 3 करोड अॅक्टिव्ह युजर्स मिळत होते. या गेमध्ये सर्वाधिक अॅक्टिव युजर्सची संख्या ही भारतात होती. कारण टेंसेंट भारतात सर्वाधिक कमाई करणारा अॅप होता. दरम्यान, भारतात गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोर येथून PUBG मोबाईल गेम हटवला आहे. हा गेम फक्त त्याच युजर्ससाठी उपलब्ध होता ज्यांनी आधीपासून इंस्टॉल केला होता.