भारतात पजबी गेम (PUBG Game) वर बंदी घातल्यानंतरही युजर्स गेम खेळू शकत होते. मात्र आता नव्या अपडेटनंतर युजर्सला या गेमचा आनंद घेता येणार नाही. भारतीय युजर्स आता पबजी गेम गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) किंवा अॅप स्टोअर (App Store) वरुन डाऊनलोड करु शकणार नाहीत. पबजी हा गेम चायनीज कंपनी पबजी कॉर्पोरेशन (PUBG Corporation) यांनी बनवला असून गेल्या महिन्याभरापासून तो भारतात पूर्णपणे बॅन आहे. (PUBG Team Up With Reliance Jio: भारतात परत येणार PUBG? डिस्ट्रीब्यूशन ला घेऊन रिलायन्स जिओशी बातचीत सुरु)
भारतीय गेमर्सनुसार, बॅन झाल्यानंतरही गेमर्स पबजी गेमचा आनंद घेऊ शकत होते आणि अगदी सहज चिकन डिनरचा आस्वाद घेत होते. गेम खेळणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे गेमर्सला सहज चिकन डिनर मिळत होते. परंतु, आता गेम खेळण्यासाठी एक अपडेट डाऊनलोड करावा लागणार आहे. पबजीवर बंदी असल्याने गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरुन पबजी गेमचा नवा अपडेट भारतीय युजर्सला डाऊनलोड करता येणार नाही. परिणामी गेमचा खेळण्याचा आनंद गेमर्सला मिळणार नाही. रिपोर्ट्सनुसार, पबजी गेम खेळणाऱ्यांमध्ये बहुतांश संख्या ही भारतीय गेमर्सची आहे.
2 सप्टेंबर रोजी भारत सरकारने डेटा सुरक्षितेतच्या दृष्टीने पबजी मोबाईल सह 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली. बंदी घालण्यात आलेल्या मोबाईल अॅपच्या यादीत बायदू, बायदू एक्स्प्रेस, Tencent Watchlist, FaceU, WeChat Reading & Tencent Weiyun, PUBG Mobile आणि PUBG Mobile Lite या गेम्सचा समावेश होता. यापूर्वी भारत सरकारने लोकप्रिय टिकटॉक, युसी ब्राऊजर यांसारखे चायनीज मोबाईल अॅप्स बॅन केले होते. (PUBG Ban Effect: पबजी बॅन झाल्याने निरागस मुलाने असा व्यक्त केला राग; पहा Funny Video)
पबजी गेम बॅन झाल्यानंतर पबजी प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असली तरी पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पबजी बॅनवर अनेक जोक्स, मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, भारत सरकारने पबजी मोबाईल अॅपवर बंदी घातल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने FAU:G या भारतीय बनावटीच्या अॅपची घोषणा झाली.