PUBG (Photo Credits: PUBG)

भारतात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पब्जीसह (PUBG)  117 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली. यात भारतात पबजी गेम्सचे असंख्य चाहते असून पबजी भारतात बॅन झाल्याने या पबजी प्रेमींवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा या दु:खी प्रेमींसाठी एक आशादायक बातमी समोर येत आहे. पबजी गेम पुन्हा भारतात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. याच्या डिस्ट्रीब्यूशनला घेऊन रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीशी बोलणे चालू असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. पबजी हा साउथ कोरियन कंपनी ब्लू होल स्टुडिओचा गेम आहे. हा गेम भारतात बंद झाल्यानंतर चीनी कंपनी Tencent शी ब्लू होल स्टुडिओ (Blue Hole Studio) पबजी मोबाईलची फ्रेंचायजी परत घेतली आहे आणि रिलायन्स जिओशी वितरणासंदर्भात बातचीत चालू आहे.

जर हा करार यशस्वी झाला तर पबजी लवकरच भारतात होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या मात्र या कंपन्यांची आपापसांत बातचीत सुरु असून लवकरच ते अंतिम निर्णयावर येतील.

हेदेखील वाचा- PUBG Ban: भारतात PUBG Mobile चे Franchise सुरु करण्यासाठी पबजी कॉर्पोरेशन तोडणार Tencent गेम्ससोबतचे संबंध

दरम्यान काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या (West Bengal) नादिया जिल्ह्यात 21 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने पबजी (PUBG) खेळू न शकल्यामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. चकटाहा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पूर लालपूर येथे आयटीआयचा विद्यार्थी प्रीतम हलदर हा त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. प्रीतमची आई रत्ना हलदार यांंच्या माहितीनुसार प्रीतम पबजी खेळ बॅन झाल्याने प्रचंड नाराज होता, घटनेच्या दिवशी तो सकाळी उठुन नाष्टा करुन पुन्हा आपल्या रुम मध्ये निघुन गेला दुपारपर्यंत त्याचा आवाज पण येईना म्हणुन शेवटी रत्ना त्याला जेवणासाठी बोलवायला म्हणुन दार ठोठवायला गेल्या. यावेळेस त्याने खोलीला आतुन कडी लावली होती. बराच वेळ त्याने दार न उघडल्याने रत्ना यांंनी घाबरुन शेजार्‍यांंना बोलावले ज्यांंनी दार तोडल्यावर आत प्रीतम पंख्याला लटकुन मृतावस्थेत दिसुन आला.