PUBG (Photo Credit: File Photo)

PUBG Ban: पबजी गेम डेव्हलप करणारी कंपनी पबजी कॉर्पोरेशनने चीनची टैंसेंट गेम्स (Tencent Games) सोबत संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पबजी गेम हा दक्षिण कोरीयाची कंपनी पबजी कॉर्पोरेशनने तयार केला आहे. परंतु भारत आणि चीन मध्ये चीनची कंपनी टैंसेट गेस्मस पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइटचे संचालन करत आहे.(PUBG Among 118 Chinese Apps Banned: भारतात पबजी, लूडो गेमसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी; पाहा संपूर्ण यादी)

भारतात PUBG गेम वर बंदी घातल्यानंतर कंपनीने असे म्हटले होते की, सरकार सोबत गेम पुन्हा सुरु करण्यासंबंधित बातचीत करत आहोत. त्यानंतर आता कंपनीने म्हटले आहे की, भारतीय बाजारात पुन्हा येण्यासाठी ते टैंसेंट गेम्स सोबत आपले संबंध तोडणार आहेत. या बद्दलची माहिती कंपनीने वेबासाईट्सवर दिली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर असे लिहिण्यात आले आहे की, भारतात पबजी गेमची संपूर्ण जबाबदारी स्वत: घेणार आहेत. तसेच युजर्सला नवा अनुभव देण्यासाठी काम करणार आहेत. परंतु पबजी कंप्युटरवर खेळू शकतो.पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइटचे फ्रेंचाइजी चीनची सर्वात मोठी गेमिंग कंपनी टैंसेंटजवळ आहे. पबजी मोबाईल आणि पबजी लाईट हे दोन्ही पबजी कॉर्पोरेशन आणि टैंसेंट गेम्स यांनी मिळून तयार केले आहे. (PUBG Korean Version In India: भारतामध्ये खेळू शकता पबजी गेमची कोरियन आवृत्ती, जाणून घ्या हे अॅप डाऊनलोड करण्याची प्रक्रिया )

दरम्यान, गेल्याच आठवड्यात भारत सरकारने पबजीसह 117 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच याबाबत आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.