गुगलने (Google) नुकताच आपला लेटेस्ट स्मार्टफोन पिक्सल 5a लॉन्च केल्यानंतर आता पिक्सल 5 आणि पिक्सल 4a 5G बंद केला आहे. स्मार्टफोन गुगलच्या ऑनलाईन स्टोअरवर Sold Out रुपात लिस्टेड करण्यात आला आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, पिक्सल 6 साठीच पिक्सल 5 बंद केला आहे. जो या वर्षाच्या ऑक्टोंबर महिन्यात येणार आहे. पिक्सल 4a बंद करण्यामागील समजू शकतो. कारण पिक्सल 5a हा नुकताच आला आहे. तर गुगल आता पिक्सल 6 शेड्युअल पूर्वी लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
गुगलने एका विधानात असे म्हटले आहे की, पिक्सल 4a 5G आणि Pixel 5 स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. आमच्या सध्याच्या फोरकास्टसह आम्ही अपेक्षा करतो की, पिक्सल 5a (5G) लॉन्च केल्यानंतर पुढील आठवड्यात अमेरिकेत गुगल स्टोअर पिक्सल 4a (5G) आणि पिक्सल 5 विक्री करणार आहे. तर गुगलने पिक्सल 5 ची घोषणा केल्यानंतर काही महिन्यांनी पिक्सल 4 आणि 4XL बंद केले होते. खरंतर अशी गोष्ट आहे की, पिक्सल 5 आणि पिक्सल 4a us भारतात लॉन्च करण्यात आले नव्हते. पिक्सल 5a बद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोन अद्याप भारतात लॉन्च केला जाणार नाही आहे. फक्त तो जापान आणि संयुक्त राज्य अमेरिकेत उपलब्ध असणार आहे.(Oneplus 9 RT: वनप्लस कंपनीचा आगामी OnePlus 9 RT स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता, पहा फोनची वैशिष्ट्ये)
पिक्सल 5a एक मिड-रेंजर आहे. ज्यामध्ये पिक्सल 4a सारखेच फिचर्स आहेत. स्मार्टफोन मध्ये 6.34 इंचाचा डिस्प्ले आणि 60HZ चा हाय रिफ्रेश रेटसह येणार आहे. पिक्सल 5a ला पॉवर देण्यासाठी एक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 756G प्रोसेसर आहे. जो 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येणार आहे. स्मार्टफोन आउट ऑद बॉक्स Android 11 वर चालतो.