भारतातील प्रसिद्ध डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे (PhonePe) धनत्रयोदशी (Dhanteras) आणि दिवाळी (Diwali) निमित्त ग्राहकांसाठी खुशखबर घेऊन आला आहे. सोने (Gold), चांदीच्या (Silver) नाणी आणि बारवर आकर्षक कॅशबॅक (Cashback) ऑफरची घोषणा फोनपे ने केली आहे. या ऑफरअंतर्गत फोनपेवरून चांदीची नाणी आणि बार खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक तर सोन्याची नाणी आणि बार खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल.
फोनपे हे 24K सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी भारतभरातील लाखो यूजर्सचे पसंतीचे प्लॅटफॉर्म आहे. गुणवत्ता, शुद्धता आणि सोयीस्कर होम डिलिव्हरीच्या हमी यूजरला फोनपे मधून मिळते. फोनपे मधून खरेदी केल्यावर तुमची सोन्याची किंवा चांदीची नाणी/बार थेट तुमच्या दारात पोहचवली जातील, असे कंपनीने म्हटले आहे.
या उत्सव ऑफरचा लाभ घेण्यासाठी यूजर्सना फोनपे अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधीपासून फोनेपे अॅप असेल तर तो उपडेट करणे गरजेचे आहे. अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर गोल्ड किंवा सिल्व्हर आयकॉनवर क्लिक करावे लागेल आणि आपल्या आवडीचे प्रॉडक्ट निवडावे लागेल. त्यानंतर डिलिव्हरी संबंधित माहिती भरावी लागेल आणि आवडीच्या पेमेंट मोडचा वापर करून पैसे भरावे लागतील .
पेमेंट अॅपवरील सर्व UPI मनी ट्रान्सफर, ऑफलाईन आणि ऑनलाईन पेमेंट (यूपीआय, वॉलेट, क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर) विनामूल्य आहेत आणि ते सर्व यूजर्ससाठी विनामूल्य राहतील. फोनपे या व्यवहारांसाठी शुल्क आकारत नाही आणि भविष्यातही असे करणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. (PhonePe वरुन मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मोजावे लागणार Extra Charges)
फोनपे चे एकूण 325 दशलक्ष नोंदणीकृत यूजर्स आहेत. यूजर्स या प्लॅटफॉर्मद्वारे पैसे पाठवू शकतात, मोबाइल रिचार्ज करू शकतात. यासोबतच डीटीएच रिचार्ज आणि युटिलिटी पेमेंट करू शकतात. तसेच यूजर्स सोने खरेदी आणि गुंतवणूक सुद्धा फोनपे द्वारे करू शकतात. फोनपे ने 2017 मध्ये गोल्ड लॉन्च केले होते. यूजर्स प्लॅटफॉर्मवर 24-कॅरेट सोने सुरक्षितपणे खरेदी करू शकतात.