Paytm (Photo Credits: ANI)

डिजिटल पेमेंट सर्विस देणारी कंपनी Paytm ने देशभरात FASTag आधारित पार्किंग सेवा देण्यास सुरुवात केली आहे. पेटीएम बँक लिमिडेटने सोमवारी याची माहिती देत असे म्हटले की, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन सोबत हातमिळवणी करत देशात प्रथमच फास्टॅग आधारित मेट्रो पार्किंग सेवा सुरु केली आहे. तर पेटीएम बँक लिमिटेड यांनी असे म्हटले की, फास्टॅगच्या माध्यमातून पार्किंवर शुल्क जमा केला जाईल.(Zomato च्या माध्यमातून केली जाणार अवघ्या 15 मिनिटांत फूड डिलिव्हरी)

DMRC चे प्रबंध निर्देशक मंगू सिंह यांनी पीपीबीएल द्वारे जाहीर करण्यात आलेल्या एका विधानात असे म्हटले आहे की, आमच्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न देण्यासाठी उचललेले हे एक पाऊल आहे. खासकरुन अशा काळात जेव्हा एकमेकांशी संपर्क न करता देवाणघेवाण करावी लागत आहे. पेटीएमने कश्मीर गेट मेट्रो स्थानकात फास्टॅग आधारित पार्किंग सुविधा सुरु केली आहे.

PPBL वॅलिड फास्टॅग स्टिकर असणाऱ्या कारसाठी सर्व फास्टॅघ आधारित देवाणघेवाणीच्या प्रोसेसिंगची सुविधा दिली जाणार आहे. यामुळे कॅश काउंटवर पैसे देण्याची गरज भासणार नाही आहे. या व्यतिरिक्त पेटीएम पेमेंट्स बँकेने पार्किंग साइट मध्ये एन्ट्री करणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी एक युपीआय आधारित पेमेंट सुद्धा सुरु केले आहे.(Elon Musk ची कंपनी SpaceX त्यांच्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज; 15 सप्टेंबर रोजी सुरु होणार मिशन 'Inspiration 4')

PPBL शॉपिंग मॉल, रुग्णालय आणि विमानतळांवर ही पार्किंगसाठी डिजिटल पेमेंट लागू करण्यासाठी विविध सुद्धा चर्चा सुरु आहे. तर पेटीएम पेमेंट्स बँक जून 1 कोटी फास्टॅग जारी करणारी देशातील पहिली बँक ठरली आहे. NPCI च्या मते जून 2021 च्या अंतापर्यंत सर्व बँकेद्वारे एकूण 3.47 कोटीहून अधिक फास्टॅग जारी केले होते.