Zomato च्या माध्यमातून केली जाणार अवघ्या 15 मिनिटांत फूड डिलिव्हरी
Zomato (Photo Credits: IANS)

ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato आपली ग्रॉसरी सर्विस येत्या 17 सप्टेंबर पासून बंद करणार आहे. कंपनीने खासकरुन हा निर्णय कमी ऑर्डर आणि खराब कंज्युमर रिव्हू मुळे घेतला आहे. झोमॅटोकडून दुसऱ्यांदा ग्रॉसरी सर्विस बंद करण्याची वेळ आली आहे. तर गेल्याच वर्षात याची घोषणा करण्यात आली. जून महिन्यात पायलट ग्रॉसरी सर्विस सुरु केली गेली. त्यावेळी कंपनीने निवडक मार्केटमध्ये फक्त 45 मिनिटांत ग्रॉसरी सर्विस देण्याचे जाहीर केले होते.

देशभरात जेव्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला तेव्हा कंपनीने या ग्रॉसरी सर्विसची सुरुवात केली. कंपनीला असे वाटत होते की, ग्रॉसरी डिलिव्हरीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जाईल. मात्र असे न झाल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोचे असे म्हणणे आहे की, फूड डिलिव्हरीच्या उद्योगातून बाहेर पडून आपल्या फूड डिलिव्हरी उद्योवर लक्ष्य केंद्रीत करु पाहत आहेत.(बँक खात्याशिवाय Google Pay वर सुरु करता येईल Fixed Deposit, जाणून घ्या याबद्दल अधिक) 

कंपनीने असे म्हटले की, त्यांना विश्वास आहे Grofers मध्ये करण्यात आलेली गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरणार आहे. अशातच कंपनीने आपल्या स्वत:च्या ग्रॉसरी सर्विसला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो कडून 100 मिलिनय USD डॉलर जवळजवळ 745 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याच प्रकारे झोमॅटोने Grofers मधील सुद्धा काही भाग खरेदी केला आहे.

दरम्यान, झोमॅटो आपल्या एक्सप्रेस डिलिव्हरी मॉडेलवर आपले पूर्ण लक्ष देणार आहे.  त्यानुसार आता कंपनी अवघ्या 15 मिनिटांत फूडची डिलिव्हरी करणार आहे. त्याचसोबत मार्केटपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना फूडची डिलिव्हरी केली जाणार आहे. याबद्दल कंपनीने आपल्या ईमेल स्टेटमेंट मध्ये घोषणा केली आहे.