पेटीएम (Paytm) कंपनी नेहमीच ग्राहकांना विविध ऑफर्स देऊन आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करीत असते. आताही घर बसल्या पैसे कमावण्याचा एका नवीन फंडा कंपनीने आणला आहे. 1 एप्रिलपासून सुरु झालेल्या नव्या आर्थिक वर्षामध्ये पेटीएम कंपनीला एक मान्यता मिळाली आहे, या मान्यते अंतर्गत तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. शेअर बाजार रेग्युलेटर सेबीने पेटीएमच्या सब्सिडियरी कंपनीला पेटीएम मनी (Paytm Money)ला स्टाॅक ब्रोकिंग सर्विससाठी मंजुरी दिली आहे. पेटीएमकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
कंपनीला मिळालेल्या या माण्यतेद्वारे लवकरच तुम्ही पेटीएमच्या अॅपवरून शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकता. कंपनी लवकरच स्टॉक एक्स्चेंजसह गुंतवणूक आणि ट्रेडिंग उत्पादने सुरू करेल. पेटीएम मनीच्या प्लॅटफॉर्मवर इक्विटी आणि कॅश सेगमेंट लवकरच सुरू होणार आहे. याआधी पेटीएमने म्युच्युअल फंडची सेवा सुरू केली आहे. यासाठी पेटीएमने 24 म्युच्युअल फंडसारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार केला आहे. सध्या बँकांमध्ये मुदत ठेवींवर 7 ते 9 टक्के परतावा मिळतो, तर म्युच्युअल फंडांना 15 टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळतो. म्युच्युअल फंडात मिळणारे रिटर्न शेअर बाजारावर अवलंबून असते. (हेही वाचा: आता Paytm वरुन करा फूड ऑर्डर!)
याशिवाय पेटीएमचा सब्सक्रिप्शन लॉयल्टी प्रोग्राम 'पेटीएम फर्स्ट' नुकताच बाजारात आला आहे. यामुळे एकाच ठिकाणी मनोरंजन, शॉपिंग आणि फूड यांसारखे अॅप वापरता येणार आहेत. पेटीएमची एका वर्षाची सब्सक्रायबर फी 750 रुपये एवढी आहे. या सुविधेमुळे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्लस अशा कंपन्यांना चांगलीच टक्कर दिली जाणार आहे.