आता Paytm वरुन करा फूड ऑर्डर!
Paytm (Photo Credits: ANI)

ई वॉलेट पेटीएमने (Paytm) बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी आणि युजर्सच्या सोयीचा विचार करुन अॅनरॉईड युजर्ससाठी नवी सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे पेटीएमवरुन युजर्स आता मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट करण्यासोबतच फूड देखील ऑर्डर करु शकता. ही फूड सेवा पुरवण्यासाठी कंपनीने झोमॅटोसोबत (Zomato) भागीदारी केली आहे. या सुविधेचा लाभ दिल्लीतील सर्व अॅनरॉईड युजर्स घेऊ शकतात. पेटीएम फूड ऑर्डर बिजनेसमध्ये उतरल्यामुळे Swiggy आणि Uber Eats ला चांगलीच टक्कर मिळेल.

येत्या काळात ही सुविधा देशभरात सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे. तसंच पेटीएम iso युजर्ससाठी देखील ही सुविधा सुरु करण्याच्या तयारीत आहे. Zomato ने देखील सर्व्हिसचा विस्तार करत 30 भारतीय शहरात फूड डिलिव्हरी सर्व्हिस सुरु केली होती. दिल्लीनंतर या महिन्याअखेरपर्यंत 100 शहरात 80 हजार रेस्टॉरन्टशी संलग्न होण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

इंट्रोडक्टरी ऑफरअंतर्गत पेटीएम आपल्या अॅपच्या माध्यमातून फूड ऑर्डर केल्यावर युजर्सला 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रोमोकोड "Hungry" चा वापर करावा लागेल.

यापूर्वी कॅब कंपनी ओलाने (Ola) फूडपांड्या (Foodpanda) सोबत भागीदारी केली असून 50 भारतीय शहरात आपली सेवा सुरु केली आहे.