PUBG टुर्नामेंटच्या Viewers Match मध्ये सहभाग घेऊन मिळवा Oppo F9 Pro
PUBG Mobile (Photo Credit: Twitter)

तरुणाईमध्ये लोकप्रिय झालेला PUBG गेमने एक नवी ऑफर सादर केली आहे. Oppo F9 Pro जिंकण्याची आजची शेवटची संधी आहे. पबजीने अलिकडेच मोबाईल इंडिया 2019 ची सुरुवात केली होती. ज्या अंतर्गत गेम्सचे क्वॉलिफायर राऊंडसाठी निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात 2000 लोकांची निवड झाली आहे. PUBG ने प्लेऑफ राऊंडची सुरुवात 10 फेब्रुवारीला केली होती आणि 24 फेब्रुवारी म्हणजे आज त्याचा शेवटचा दिवस आहे. प्ले ऑफ राऊंडचे लाईव्ह स्ट्रिमिंग बघितल्याने तुम्ही ओप्पो स्मार्टफोन F9 Pro जिंकू शकता. याची माहिती कंपनीने ट्विट करुन दिली आहे. PUBG खेळणाऱ्यांसाठी खुशखबर; गेम खेळून जिंका 1 कोटी रुपये

पबजीने ट्विटमध्ये लिहिले की, "ओप्पो फोन जिंकण्यासाठी 10-14 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या ओप्पोX पबजी मोबाईल इंडिया सिरीज ऑनलाईन प्लेऑफचे लाईव्ह स्ट्रिमिंग आणि व्हिवर्स मॅचमध्ये सहभागी व्हा." अलिकडेच भारतात Oppo F9 Pro किंमतीत 2 हजार रुपयांची कमतरता झाली आहे. त्यानंतर हा मोबाईल केवळ 19,140 रुपयांना उपलब्ध आहे.

पबजी मोबाईल टुर्नामेंटच्या क्वॉलिफायरची सुरुवात 21 जानेवारीपासून झाली होती. त्यानंतर 27 जानेवारीपर्यंत गेम सुरु होता. निकाल पाहण्यासाठी https://pubgmobile.in/indiaseries/Pubg/Results या लिंकवर क्लिक करा. भारतातील टुर्नामेंटची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यासाठी प्लेअर्सला पहिल्यांदा गेम्स क्वॉलिफायर राऊंड क्लिअर करावा लागेल. त्यानंतर ऑनलाईन प्लेऑफ आणि नंतर ग्रँड फायनल राऊंड द्यावा लागेल. यात युजर्स प्ले ऑफ राऊंडचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहु शकतात.