ओप्पो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन ओप्पो रेनो 3 प्रो (Oppo Reno 3 Pro) च्या किमतीत मोठी घट झाली आहे. कंपनीने रेनो 3 प्रो व्हेरिएंटमधील 8 जीबी आणि 128 रॅम असलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत 2 हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे. ओप्पो रेनो 3 प्रो हा स्मार्टफोन मार्च महिन्यात लॉन्च झाला होता. मात्र, संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत केल्यानंतर या स्मार्टफोनच्या विक्रीत घट झाली होती. मार्चपासून आतापर्यंत या स्मार्टफोनच्या किंमतीत तिसऱ्यांदा कपात केली होती. या फोनमध्ये मागील बाजूला 64 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड-रिअर कॅमेरा अर्थात 4 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि सेल्फीसाठी ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप, असे एकूण सहा कॅमेरे आहेत.
ओप्पो रेनो 3 प्रो च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 2 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता ते 25,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या व्हेरिएंटची नवीन किंमत अमेझॉनवर अपडेट करण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनच्या 256 जीबी स्टोरेजचे व्हेरिएंट अद्याप 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. या व्हेरिएंटची किंमत कमी केलेली नाही. हे देखील वाचा- WhatsApp Chats वर नवनवे वॉलपेपर्स कसे सेट कराल?
ओप्पो रेनो 3 प्रो एंड्रॉइड 10 बेस्ड कलरओएस 7 वर कार्य करते. फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक हेलियो पी 95 प्रोसेसरसह 8 जीबी रॅम आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये 128 जीबी आणि 256 जीबी अंतर्गत स्टोरेज पर्याय आहेत. मायक्रो-एसडी कार्डवरून स्टोरेज वाढविला जाऊ शकतो.
फोनच्या मागच्या बाजूला सहा कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 64 मेगापिक्सल प्राइमरी, 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेन्सरचा समावेश आहे. फोनच्या समोर 44 मेगापिक्सलचे 2 कॅमेरे आणि 2 मेगापिक्सेल देण्यात आले आहेत. ओप्पो रेनो 3 प्रो मध्ये 4025 एमएएच बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह आला आहे.