सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया माध्यमं अत्यंत प्रभावी ठरत आहेत. चॅटिंगसाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) अगदी सर्रास वापरले जाणारे माध्यमं. हे लोकप्रिय माध्यम युजर्संना खुश करण्यासाठी नवनवे फिचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅचे असेच एक मस्त फिचर म्हणजे व्हॉट्सअॅप चॅटवर आपण आपल्या आवडीचा वॉलपेपर सेट करु शकतो. तर आज आपण जाणून घेऊया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप चॅट (Whatsapp Chats) वर वॉलपेपर (Wallpaper) कसा सेट कराल? कंपनीकडून चॅट सेक्शनमध्ये वॉलपेपर्स देण्यात आलेले असतात. तसंच वेगवेगळ्या रंगाचं बॅकग्राऊंड देखील तुम्ही व्हॉट्सअॅप चॅटवर सेट करु शकता. त्याचप्रमाणे 'Wallpaper Library' मध्ये देखील वॉलपेपरचे विविध पर्याय उपलब्ध असतात. गुगल प्ले स्टोअर वरुन Wallpaper Library डाऊनलोड करुन तुम्ही आवडता वॉलपेपर व्हॉट्सअॅप चॅटवर सेट करु शकता. जाणून घ्या, WhatsApp Chats वर वॉलपेपर्स कसे सेट कराल? (WhatsApp Messages ओपन न करता कसे वाचाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स)
WhatsApp Chats वर वॉलपेपर्स सेट करण्याची पद्धत:
# व्हॉट्सअॅप ओपन करा आणि कोणत्याही चॅटमध्ये जा.
# स्मार्टफोन स्क्रिनवरील उजव्या बाजूला वर असलेल्या तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा.
# 'Wallpaper' वर क्लिक करा आणि तिथे तुम्हाला वॉलपेपर बदलण्याचे पाच मार्ग दिसतील- 'No Wallpaper', 'Gallery', 'Solid Colour', 'Wallpaper Library' आणि 'Default'.
# 'Wallpaper Library' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर रिडिरेक्ट केले जाईल. तेथून 'WhatsApp Wallpaper'डाऊनलोड करुन इन्स्टॉल करा. (WhatsApp Always Mute Feature: व्हॉट्सअॅपच्या अनावश्यक नोटिफिकेशनला मिळणार कायमची सुट्टी; 'हे' फिचर्स ठरणार उपयुक्त)
# अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला तिथे अनेक सुंदर वॉलपेपर्स दिसतील. त्यातील तुमच्या आवडीचा वॉलपेपर तुम्ही निवडू शकता.
# पुन्हा व्हॉट्सअॅप ओपन करा आणि तीन डॉट असलेल्या आयकॉनवर क्लिक करा.
# Wallpapers' आणि 'Wallpaper Library' मधून हवा असलेला वॉलपेपर सेट करा.
आनंदी, पॉझिटीव्ह वॉलपेपर्स तुमचा मूड बदलण्यासाठी नक्कीच मदत करतील. इतकंच नाही तर तुमच्या फोनचा लूकही छान खुलेल.