स्मार्टफोन (Smartphone)  निर्माता कंपनी ओपोने (Oppo) त्यांचा नवा स्मार्टफोन Reno2 बाजारात घेउन येत आहे. कंपनीने काही महिन्यापूर्वा या स्मार्टफोनबदल चर्चा केली होती. हा स्मार्टफोन आयफोनसारख्या (Iphone) स्मार्टफोनलाही टक्कर देईल, असे सांगण्यात आले होते. सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारात एमआयसारखी चीनी कंपनी त्यांचे वर्चस्व गाजवत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या निरनिराळी योजना आखत आहे. ओपो कंपनीने याआधी Reno2 या स्मार्टफोनच्या बाबतीत काही माहिती दिली होती. हा स्मार्टफोन बाजारात कधी दाखल होतो? याकडे अनेक लोकांचे लक्ष वेधले होते. आज ओपो कंपनीने त्यांच्या ट्विटर अकाउंट Reno2 स्मार्टफोनचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच हा स्मार्टफोन २८ ऑगस्ट रोजी ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याचे सांगितले आहे.

ओपो Reno2 स्मार्टफोनचे वैशिष्ट

 

ओपोच्या या धमाकेदार स्मार्टफोनमध्ये आकर्षित वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. ओपोच्या या Reno2 स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ४००० एमएएचची क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच ओपो कंपनीचा ४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. याशिवाय कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. काही तासानंतरच हा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हे देखील वाचा-आयफोन युजर्सला आता स्वत:च्या चेहऱ्याचा इमोजी WhatsApp वर वापरता येणार

 

भारतात ओपो कंपनीने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. हा स्मार्टफोन ओपो कंपनीचा सर्वात अत्याधुनिक स्मार्टफोन ठरेल, अशी आशा कंपनीकडून केली जात आहे.