आयफोन युजर्सला आता स्वत:च्या चेहऱ्याचा इमोजी WhatsApp वर वापरता येणार
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

अॅपल आयओस Apple iOS) युजर्सला आता व्हॉट्सअॅमध्ये (WhatsApp) स्वत:च्या चेहऱ्याचा इमोजी वापरता येणार हे. WaBetInfo मध्ये असे सांगितले आहे की, आयफोन युजर्सला आता मीमोजी (Mimojo Stickers) नावाचे फीचर लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबत एक स्क्रिनशॉट सुद्धा सोशल मीडियात शेअर करण्यात आला होता.

व्हॉट्सअॅप 2.19.90.23 वर्जनमध्ये युजर्सल मोमीजी नावाचे स्टिकर्स नावाचे ऑप्शन देण्यात येणार आहे. हे फिचर iPhone X, iPhone XS, iPhone XS Max आणि XR युजर्सला वापरता येणार आहे. मोमीजी स्टिकर्सला अॅपलने 2018 मध्ये iOS 12 सोबक लॉन्च करण्यात आला होता. हे कस्टमाइज इमोजी युजर्सच्या पर्सानालिटी आणि मुडसोबत मॅच करत डिझाइन करता येणार आहेत. तसेच हे इमोजी मेसेज आणि फेसटाइमवेळी सुद्धा युजर्सला वापरता येऊ शकतात. मीमोजीमध्ये युजर्सला आयशॅडो, लिपस्टिक, पिअर्सरिंग आणि दातासंबंधित काही ऑप्शनस देण्यात येणार आहेत.(WhatsApp मध्ये लवकरच Boomerang फिचर येणार)

तसेच नव्या अपडेटनुसार WhatsApp by Facebook नावाचे लेबल सुद्धा दिसणार आहे. व्हॉट्सअॅपमधील हे बदल लवकरच अॅन्ड्राइड बीटा वर्जन 2.19.222 मध्ये नुकतेच पाहायला मिळाले होते. असे सांगितले जात आहे की, एका रिपोर्टनुसार अॅप स्टोअरवर 2.19.20 ऑफिशल अपडेट मध्ये मीमोजी सपोर्ट आयफोन युजर्सला मिळणार आहे.