Oppo A5s भारतात लॉन्च, 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमती मधील स्मार्टफोनमध्ये मिळणार दमदार फिचर्स
Oppp A5s (Photo Credits-Facebook)

चीन (China) स्मार्टफोन कंपनी Oppo ने त्यांचा नवीन मॉडेल मधील Oppo A5s भारतात लॉन्च केला आहे. तर 9,990 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्क्रिन असून मीडियोटेक हेलियो पी35 चिपसेटवर काम करणार आहे. तसेच कंपनीने असे सांगितले आहे की, 4230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Oppo A5s दोन वर्जनध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये 2GB RAM, 32GB ROM तर 4GB RAM, 64GB ROM देण्यात आला आहे. तसेच 6.2 इंचाचा एलसीडी वॉटरड्रॉप स्क्रिन दिली आहे. तर स्मार्टफोनमध्ये 8MP आणि 13MP Pluse2 MP डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. भारतातील हा प्रथम असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक हेलियो पी 35 प्रोसेसरवर काम करतो.(हेही वाचा-24 एप्रिलला लॉन्च होणार Redmi Y3 स्मार्टफोन, सेल्फी काढण्यासाठी मिळणार 34 MP कॅमेरा)

रियर फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा ओप्पो ए5एस मध्ये देण्यात आले आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल येथे खरेदी करता येणार आहे. तर ग्रीन आणि गोल्ड या दोन कलर मध्ये ग्राहकांना स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.