वनप्लस 8 प्रो 5G (OnePlus 8 Pro 5G) स्मार्टफोनचा आज भारतात सेल सुरु होणार आहे. वनप्लसच्या अधिकृत वेबसाईट (OnePlus.in) आणि अॅमेझॉन इंडिया (Amazon.in) वर आज दुपारी 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात होईल. या सेलअंतर्गत वनप्लस 8 प्रो 5G स्मार्टफोन आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. एसबीआय बँकेच्या कार्डवरुन (SBI Bank Card) पेमेंट केल्यास 3 हजार रुपयांची सूट देण्यात येईल. तर स्मार्टफोनचे प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना 1000 रुपयांचा अॅमेझॉन पे कॅशबॅक दिला जाणार आहे. तसंच नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) ऑप्शनसह रिलायन्स जिओचे (Reliance Jio) 6000 रुपयांचे बेनिफीट्स दिले जातील.
OnePlus 8 Pro 5G मधअये 6.78 इंचाचा QHD+ Super AMOLED fluid डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120 Hz इतका असून याचे रिजोल्यूशन 2400x1080 मेगापिक्सल इतके आहे. या स्मार्टफोनमध्ये चार रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. Sony IMX689 चा 48MP चा मेन कॅमेरा असून 48MP चा अल्ट्रा वाईल्ड एगल लेन्स कॅमेरा देखील आहे. त्याचप्रमाणे 8MP चा टेलिफोटो कॅमेरा आणि 5MP कलर फिल्टर सेंसर आहे. या मोबाईलला 6MP चा Sony IMX471 पंचहोल फ्रंटइन्ड कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये क्वॉलकाम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असून 4510 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच 30W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा आहे.
OnePlus 8 Pro हा स्मार्टफोन 8GB RAM + 128GB आणि 12GB RAM + 256GB या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तसंच हा स्मार्टफोन ग्लेशिअल ग्रीन, ऑनिक्स ब्लॅक आणि अल्ट्रामरिन ब्लू या कलर शेडमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 च्या OxygenOS 10 या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्यरत आहे. मोबाईलमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लुट्युब v5.1, GPS/A-GPS, NFC, USB Type-C port आणि 4G LTE देखील देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनच्या 8GB+128GB वेरिएंटची किंमत 54,999 रुपये इतकी असून 12GB आणि 256 GB वेरिएंटची किंमत 59,999 रुपये इतकी आहे.