बहुचर्चित असलेला वनप्लस 7T (OnePlus 7T) स्मार्टफोन आणि वनप्लस टीव्ही (OnePlus TV) अखेर भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाले आहेत. OnePlus 7T हे कंपनीच्या बाजारात असलेल्या OnePlus 7 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यात कालानुरुप बदल करत विविध अपडेड्स दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की, कंपनीने आपल्या प्रॉडक्टमध्ये चांगला स्पर्श (टच) आणि त्यातून येणारा फील यावर विशेष लक्ष दिले आहे. OnePlus 7T हे कंपनीचे यशस्वी उत्पादन राहील असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, OnePlus 7T हा फोन जाडीला 8.1mm इतका आहे. यात ट्रिपल कॅमेरा सिस्टमही दिली आहे. फोन कॅमेऱ्यासोबाबत सांगायचे तर OnePlus 7T में स्नॅपड्रॅगन 855+ सोबत 90Hz स्क्रीन आणि 48 मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे. तर सेकेंड्री कॅमेरा 117 डिग्री अल्ट्रा वाइड सेन्सरवाला आहे. तीसरा सेन्सर टेलिफोटो लेन्सवाला आहे. वनप्लसने याशिवाय वव्या वर्क-लाईफ बॅलेन्स मोडसोबत वनप्लस पे सर्विसचीही घोषणा केली आहे. (हेही वाचा, Xiaomi चा दिवाळी धमाका, 1 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार)
वनप्लस टीव्ही मध्ये QLED स्क्रीन दिली आहे. जी 55 इंचाची आहे. इतकेच नव्हे तर, Dolby Atmos आणि Dolby Vision चे सपोर्टही दिला आहे. विशेष म्हणजे हा एँड्रॉयड 9 फाई टीव्ही असेन. ज्यात वनप्लस टीव्ही कंट्रोल करण्यासाठी डेडिकेटेड अॅप घेईल. वनप्लस 7टी ची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये आहे. तर, वनप्लस टीव्ही क्यू1 69,900 रुपयांना मिळेल. वनप्लस टीव्ही क्यू1 प्रो 99,900 रुपयांमध्ये मिळेल. कंपनीने भारतातील आठ शहरांमध्ये वनप्लस पॉपअप सुरु करण्याचीही घोषणा केली.