Bulli  Bai App नंतर Telegram वरील अश्लील चॅनलच्या माध्यमातून हिंदू महिलांना केले जात होते टार्गेट, IT मंत्रालयाने केली कारवाई
Telegram (Photo Credits-Twitter)

बुल्ली बाई अॅपवरुन (Bulli Bai App) वाद सुरु झाल्यानंतर अशाच प्रकारचा आणखी एका चॅनल समोर आला आहे. जो खासकरुन हिंदू महिलांना टार्गेट करण्यासाठी वापरला जात होता. या प्रकरणी कारवाई करत आयटी मंत्रालयाने मंगळवारी टेलिग्रामवरील (Telegram) एका चॅनलला ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये आपल्या कस्टमरदरम्यान हिंदू महिलांचे फोटो शेअर करण्यासह त्यांचा गैरवापर केला होता. चॅनल हा कथित रुपात जून 2021 मध्ये तयार करण्यात आला होता.('Bulli Bai' App Case मध्ये मुंबई पोलिसांकडून आणखी एका विद्यार्थ्याला अटक झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती)

केंद्रीय सूचना प्रसासण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक ट्विटर युजर द्वारे चॅनलची माहिती शेअर केल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. ट्विटचे उत्तर देत त्यांनी असे म्हटले की, चॅनलला ब्लॉक करण्यात आले आहे. तसेच भारत सरकारकडून कारवाई करण्यासाठी राज्य पोलीस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहेत.(Bulli Bai Case Update: 'बुल्‍ली बाई' प्रकरणात मुंबई पोलिसांकडून मुख्य आरोपी महिलेला अटक; सह-आरोपी Vishal Kumar ला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी)

Tweet:

दरम्यान, ओपन-सोर्स प्लॅटफॉर्म गिटहबवर बुल्ली बाई नावाच्या वेबपेजच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे मुस्लिम महिलांसंदर्भातील धक्कादायक लिलावाचा प्रकार समोर आला होता. काही राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ही कारवाई केली गेली. ट्विटरवर प्रभावशाली असलेल्या शेकडो मुस्लिम महिलांची डोडी अॅपवर लिलावासाठी यादी करण्यात आली होती, ज्यांचे फोटो काढण्यात आले होते आणि परवानगीशिवाय छेडछाड करण्यात आली होती. वर्षभरात ही दुसरी वेळ आहे. 'बुली बाई' अॅप 'सुली डील्स' प्रमाणेच काम करते.

'बुल्ली बाई' अॅपवरून मुंबई सायबर पोलिसांनी सोमवारी बेंगळुरूमधील एका 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक केली. विशाल कुमार असे आरोपीचे नाव आहे. पुढे असे कळते की, आरोपी आणि सहआरोपी हे सोशल मीडियावर मित्र होते आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर जोडलेले होते.