'बुल्ली बाई' (Bulli Bai) प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या एका महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेवर बुल्ली बाई नावाच्या अॅपद्वारे मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांचा लिलाव केल्याचा आरोप आहे. या महिलेला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. महिलेला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात येत आहे. त्याआधी तिला ट्रान्झिट रिमांडसाठी उत्तराखंड न्यायालयात हजर केले जाईल. यापूर्वी सोमवारी बेंगळुरू येथील 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी विशाल कुमार याला पोलिसांनी अटक केली होती.
हे दोघेही या प्रकरणातील सहआरोपी असून एकमेकांना ओळखतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र आहेत, त्यामुळे ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी महिला 'बुल्ली बाई’अॅपशी निगडीत तीन खाती हाताळत होती. सहआरोपी विशाल कुमार याने खालसा सुप्रीमिस्टच्या नावाने खाते उघडले होते. 31 डिसेंबर रोजी त्यांनी इतर खात्यांची नावे बदलून शीख नावांशी मिळतीजुळती नावे ठेवली.
The main accused woman was handling three accounts related to 'Bulli Bai' app. Co-accused Vishal Kumar opened an account by the name Khalsa supremacist. On Dec 31, he changed the names of other accounts to resemble Sikh names. Fake Khalsa account holders were shown: Mumbai Police
— ANI (@ANI) January 4, 2022
मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने 3 जानेवारी रोजी बेंगळुरू येथून विशाल कुमारला ताब्यात घेतले होते. मात्र, मंगळवारी, 4 जानेवारी रोजी दुपारी त्याला अटक करण्यात आली. सोशल मीडियावरील माहितीद्वारे हे दोघेही आरोपी मुस्लिम नाहीत. बुल्ली बाई' अॅप प्रकरणातील आरोपी विशाल कुमारला मुंबईतील वांद्रे न्यायालयात आज हजर करण्यात आले. वांद्रे न्यायालयाने आरोपी विशाल कुमारला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, विशाल कुमारचे वकील डी. प्रजापती यांनी माझ्या अशिलाला या प्रकरणात मुद्दाम गोवण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
Mumbai | My client has been sent to police custody till January 10. My client is falsely implicated in this case. Police had filed an application to obtain a search warrant: Advocate D. Prajapati, lawyer of 'Bulli Bai' app case accused Vishal Kumar pic.twitter.com/aKA3lKFGk3
— ANI (@ANI) January 4, 2022
#WATCH 'Bulli Bai' app case accused Vishal Kumar produced before Mumbai's Bandra Court pic.twitter.com/YhyAZjkLng
— ANI (@ANI) January 4, 2022
याआधी साधारण 6 महिन्यांपूर्वी 'सुल्ली डील्स' द्वारे मुस्लिम महिलांच्या फोटोंच्या लिलावाची धक्कादायक बाब समोर आली होती.आता ‘बुल्ली बाई’ या अॅपवर किमान 100 प्रभावशाली मुस्लिम महिलांची छायाचित्रे अपलोड करून त्यांचा लिलाव होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई सायबर पोलिसांकडे हे अॅप तयार करून त्याचा प्रचार करणाऱ्या ट्विटर हँडलविरोधात एफआयआर नोंदवला होता. या तक्रारीनंतर सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत होता. याबाबत सायबर पोलिस स्टेशनमध्ये कलम 153(A), 153(B), 295(A), 354D, 509, 500 आणि IT कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.