Nokia च्या 'या' नव्या फोनमध्ये ऐकता येणार 27 तास गाणी; जाणून घ्या आणखी फीचर्स
Nokia 110 (Photo Credits: Facebook)

एमएचडी ग्लोबल या कंपनीने नुकताच नोकिया ब्रँडच्या अंतर्गत एक नवा फोन लाँच केला आहे. Nokia 110 (2019) असे या नव्या फीचर फोनचे नाव आहे.

या फोन मध्ये नोकियाचे अनेक प्रसिद्ध फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच या नव्या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे या मोबाइलवर 27 तासांपर्यंत गाणी ऐकता येऊ शकणार आहेत. इतकंच नव्हे तर या फोनमध्ये एफएम रोडिओ आहेच पण त्यासोबतच सर्वांचा आवडता सापाचा गेमसुद्धा देण्यात येणार आहे.

भारतात हा फोन खूपच कमी किंमतीत मिळणार असून तो बाजारात फक्त 1 हजार 599 रुपये इतकी असेल.

फोन ३ रंगांमध्ये उपलब्ध असेल ते म्हणजे ब्लॅक, ओशियन ब्लू आणि पिंक व हा नोकिया 110 तुम्हाला कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईट किंवा ऑफलाईन म्हणजेच दुकानातूनसुद्धा खरेदी करता येऊ शकतो.

Redmi Note 8 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्ज, ग्राहकांना दमदार फिचर्ससह 14,999 रुपयात खरेदी करता येणार

याचे मुख्य फीचर्स म्हणजे यात रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये फ्लॅश लाइटची सुविधा देखील असेल.

फोनचे इतर फीचर्स खालील प्रमाणे असतील

1.77 इंचाचा क्यूक्यूव्हीजीए डिस्प्ले

एसपीआरडी 6531 ई प्रोसेसर

5 एमबी रॅम

4 एमबी स्टोरेज

मायक्रो यूएसबी 2.0 पोर्ट

ड्युअल सीम सपोर्ट

800 एमएएच क्षमतेची बॅटरी

14 तासापर्यंत टॉक टाइम

27 तासांपर्यंत MP3 प्लेबॅक आणि 18 तास रेडिओ प्लेबॅक

मेमरी कार्डसाठी एक वेगळे स्लॉट(32 जीबी पर्यंत मेमरी कार्डला सपोर्ट)