Redmi Note 8 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च, ग्राहकांना दमदार फिचर्ससह 14,999 रुपयात खरेदी करता येणार
Redmi Note 8 Pro (Photo Credits-Twitter)

रेडमी (Redmi) नोट 8 प्रो अधिकृतरित्या भारतात नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनसाठी 64MP कॅमेरा दिला असून तो रेडमी नोट 7 प्रो सारखाच आहे. रेडमी नोट 7 प्रो मध्ये डुअर रिअर कॅमेरा सेटअपसह 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून रेडमी नोट 8 प्रो मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये octa-core MediaTek Helio G90T असून खासकरुन गेमिंगाठी बनवण्यात आला आहे. देशभरात रेडमी नोट स्मार्टफोनचे 10 करोड पेक्षा अधिक युजर्स आहेत.

रेडमी नोट 8 प्रो या स्मार्टफोनची भारतात किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होत आहे. ही किंमत 6GB आणि 64GB इंटरनल स्टोरेज असणारा स्मार्टफोन आहे. तर 6GB RAM आणि 128 स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 15,999 रुपये द्यावे लागणार आहेत. 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनसाठी 17,999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन ग्रीन, हेले व्हाइट आणि शेडो ब्लॅक सारख्या रंगांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर येत्या 21 ऑक्टोबरला अमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाईटवरुन युजर्सला खरेदी करता येणार आहे.(Amazon Great Indian Festival 2019 सेलमध्ये ग्राहकांना फक्त 4,999 रुपयात खरेदी करता येणार Redmi 7A, जाणून घ्या ऑफर्स)

या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या नव्या गेमिंग प्रोसेरस हिलिओ जी90टी चा उपयोग करण्यात आला आहे. युजर्सला गेम खेळताना सहज स्मार्टफोनचा वापर करता येण्यासाठी कंपनीने लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानाचा एक भाग समजला जात आहे. Redmi Note 8 Pro साठी 4,500 mAh बॅटरी देण्यात आली आहे.