
फेस्टिव सीजनमध्ये स्मार्टफोन कंपन्या युजर्सासाठी खास ऑफर्स सादर करत आहेत. नोकीयाने प्रिमीयम स्मार्टफोन Nokia 8 Sirocco वर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केल्या आहेत. सॅमसंगने देखील काही निवडक स्मार्टफोन्सच्या किंमतीही कमी केल्या आहेत. पाहुया काय आहे ऑफर....
Nokia 8 Sirocco
नोकीयाने भारतातील काही स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर सुरु केली आहे. त्यासाठी नोकीयाने HDFC बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. या कराराअंतर्गत Nokia 8 Sirocco या फोनवर 5,550 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. गेल्या आठवड्यात याच स्मार्टफोनच्या किंमतीत 13 हजार रुपयांची सूट जाहिर केली होती. Nokia 8 Sirocco ची किंमत 49,995 इतकी होती. त्यात 13 हजारांचे डिस्काऊंट आणि 5,550 रुपयांच्या कॅशबॅकनंतर हा फोन 31,449 रुपयांना मिळत आहे.
यावर मिळत आहे कॅशबॅक
nokia 1- ची किंमत 4999 रुपये असून त्यावर 500 रुपयांचे कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला 4499 रुपयांना उपलब्ध होईल. त्याचबरोबर nokia 2 आणि nokia 2.1 या स्मार्टफोन्सची किंमत 6999 रुपये असून 700 रुपयांच्या कॅशबॅकमुळे हा फोन तुम्हाला 6299 उपलब्ध होईल. nokia 3 ची किंमत 8499 रुपये आहे. 850 रुपयांच्या कॅशबॅकमुळे हा फोन तुम्हाला 7649 रुपयांना मिळेल. तसंच 10,499 रुपयांचा nokia 3.1 या स्मार्टफोनवर 1050 रुपये कॅशबॅक मिळत असून 9449 रुपयांना तुम्ही हा फोन खरेदी करु शकता.
HDFC कार्डधारकांना मिळेल फायदा
या ऑफरचा लाभ केवळ एचडीएफसी बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड धारकांनाच मिळेल. 5,550 कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला HDFC च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन हा फोन खरेदी करावा लागेल. याशिवाय नोकीयाच्या काही निवडक स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. ज्यात Nokia 8, Nokia 6.1, Nokia 5.1, Nokia 3 अनेक स्मार्टफोन्स सहभागी आहेत. ज्यावर HDFC च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास कॅशबॅक मिळत आहे.
सॅमसंगने देखील कमी केल्या किंमती
सॅमसंगने देखील ४ स्मार्टफोन्सच्या किंमतीत घट केली आहे. कंपनीने Galaxy J2 (2018), Galaxy J2 Core, Galaxy J4, आणि Galaxy J6 या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. ही ऑफर 15 नोव्हेंबरपर्यंत व्हॅलिड आहे.