Nokia 5.3 भारतात ओपन सेलमध्ये उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Nokia 5.3 (Photo Credits-Twitter)

HMD Global यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात त्यांचा नवा स्मार्टफोन Nokia 5.3 लॉन्च केला होता. जो आता फ्लॅश सेलसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India वर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे आता युजर्सला हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी फ्लॅश सेलची वाट पहावी लागणार नाही आहे. कारण कंपनीने हा ओन सेलसाठी उपलब्ध करुन दिला आहे. म्हणजेच युजर्सला हा स्मार्टफोन कधीही खरेदी करता येणार आहे. नोकिया 5.3 कंपनीच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त अॅमेझॉन इंडिया येथून सुद्धा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. याच्या किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास 4GB+64GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 13,999 रुपये आणि 64GB स्टोरेज मॉडेल 15,499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन चारकोल, सियान आणि सँड अशा तीन रंगात उपलब्ध आहे.

जर तुम्ही हा स्मार्टफोन Amazon येथून खरेदी करणार असल्यास तुम्हाला आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. युजर्सला 5 टक्के इंस्टंट डिस्काउंट ही दिला जाणार आहे. तर Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डनर Prime Users साठी कॅशबॅक मिळणार आहे. या व्यतिरिक्त नोकिया 5.3 स्मार्टफोन No Cost EMI ऑप्शन आणि एक्सजेंच ऑफर मध्ये खरेदी करता येणार आहे.(Samsung Galaxy A51, Galaxy A71 Prices Reduced: सॅमसंग गॅलेक्सी ए51, गॅलेक्सी ए71 स्मार्टफोनच्या किंमतीत घट; पहा नव्या किंमती)

कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये युजर्सला 6.55 इंचाचा एचडी+डिस्प्ले दिला जाणार आहे. जो 20:9 आस्पेक्ट रेश्योसह येणार आहे. त्यानंतर बॅक पॅनलमध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. खासियत म्हणजे या स्मार्टफोनच्या सिक्युरिटीसाठी फेस अनलॉक फिचर सुद्धा दिले आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 665 चिपसेटवर काम करणार आहे. यामध्ये देण्यात आलेला स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट दिला जाणार आहे.

कॅमेरा फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास नोकिया 5.3 मध्ये चार रियर कॅमेरे दिले जाणार आहेत फोनमध्ये 13MP चा प्रायमरी सेंसर दिला आहे. तर 5MP चा सेकेंडरी सेंसर, 2MP चे अन्य दोन सेंसर्स दिले आहेत. तर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, सिंगल चार्जमध्ये बॅटरी दोन दिवसांचा बॅकअप देणारी ठरणार आहे.