
मोटोरोला कंपनीने त्यांच्या मोटोरोला वन अॅक्शन ( Motorola One Action) हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. भारतात (india) हा स्मार्टफोन ३० ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. सध्या भारतात एम.आय ( MI) कंपनीच्या स्मार्टफोनला अधिक पसंती मिळत आहे. कारण या कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत सामान्य लोकांना परवडणारी असते. याचाच विचार करुन मोटोरोला कंपनीने त्यांचा मोटोरोला अॅक्शन वन हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. महत्वाचे म्हणजे, स्मार्टफोनची किंमत कमी असून यात अनेक फिचरचा समावेश करण्यात आला आहे. मोटोरोला कंपनीचा मोटोरोला वन अॅक्शन बाजारात दाखल झाल्यावर चांगली प्रसिद्धी मिळवणार, अशी अपेक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
मोटोरोला वन अॅक्शन स्मार्टफोनची किंमत आणि फिचर
या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टमध्ये अॅन्ड्राईड व्हर्जन पी असणार आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल ( १६+१२+५) रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा १२ मेगापिक्सल असणार आहे. त्याचबरोबर ३ हजार ५०० एमएएचची बॅटरी क्षमता आहे. हा स्मार्टफोन निळ्या,सफेद अशा २ रंगात उपलब्ध होणार आहे. मोटोरोला वन अॅक्शनची किंमत १३ हजार ९९९( ४जीबी रॅम, १२८ जीबी स्टोअरेज) आहे. मोटोरोला कंपनीने हा स्मार्टफोन एकाच व्हेरिअंट मध्ये लॉन्च केला आहे. ग्राहक ३० ऑगस्ट रोजी या स्मार्टफोनची खरेदी करु शकतात. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर जिओकडून २ हजार २०० रुपयांचे डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर १२५ जीबी इंटरनेट डेटाही मिळवता येणार आहे.
हे देखील वाचा-शाओमी कंपनीच्या पोको एफ १ स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळवा मोठी सूट
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक स्मार्टफोन चाहत्यांना उस्तुक केले आहे. हा स्मार्टफोन तरुणांना आकर्षित करणारा ठरेल, असा दावा कंपनीच्या आधिकाऱ्यांनी केला आहे.