भारतात शाओमी कंपनीच्या स्मार्टफोनला अधिक पसंती मिळाली आहे. आयफोन कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करणारे ग्राहकदेखील शाओमीकडे आकर्षित होताना दिसत आहेत. शाओमी कंपनी ही नेहमी ग्राहकांसाठी काही खास ऑफर घेऊन येत असते. त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. शाओमीने गेल्या वर्षी पोको एफ हा १ स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ८४५ प्रोसेसर सारख्या फिचरचा वापर केला होता. साधरणता, हे फिचर २० हजार रुपये किमतीच्या खालील स्मार्टफोनमध्ये दिसत नाहीत.
काही महिन्यांपूर्वी कंपनीने त्यांच्या अनेक स्मार्टफोनच्या किमतीत घट केली होती.सध्या शाओमी कंपनीने त्यांच्या पोको एफ १ च्या किमतीत दोन हजार रुपयांची घट केली आहे. ग्राहकांना ही ऑफर फ्लिपकार्ट अॅमेझॉन आणि एम. कॉम वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शाओमी पोको एफ १ ची वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.१८ इंच आहे. हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅममध्ये उपलब्ध आहे. पोको एफ १ च्या स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सल असून सेकंडरी कॅमेरा ५ मेगापिक्सल देण्यात आलेला आहे. फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सल असून एचडीआर फिसरलेस आहे. तसेच यात ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
पोको एफ१ मधील १२८जीबी असलेल्या स्मार्टफोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. तसेच २५६ जीबी असलेल्या स्मार्टफोनची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. ६४ जीबी स्टोअरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. शामीच्या पोको एफ१ च्या कोणत्याही वेरिंट्सच्या स्मार्टफोनवर २ हजारांची सूट मिळणार आहे.