Motorola चा लेटेस्ट स्मार्टफोन Moto G9 Plus भारतात लवकरच लॉन्च केला जाणार आहे. या डिवाइस बद्दल काही रिपोर्ट्स ही समोर आले आहेत. अशातच एका रिपोर्ट नुसार असे सांगण्यात आले आहे की, Moto G9 Plus स्मार्टफोन भारतीय Bureau of Indian Standards म्हणजेच BIS सेर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट केला आहे. माय स्मार्टप्राइजच्या रिपोर्टनुसार, मोटो जी9 प्लस मॉडेल क्रमांक XT2083-7 आणि XT2087-3 सह BIS सेर्टिफिकेशन वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंमुळे स्पष्ट झाले की, मोटी जी9 प्लस लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे. मात्र कंपनीकडून स्मार्टफोनच्या किंमतीसह स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती दिली गेली नाही.(फोन हरवल्यास किंवा खराब झाल्यास Important Contacts पुन्हा मिळवण्यासाठी काळजी करु नका, 'या' पद्धतीचा वापर करा)
मोटोरोलाने सप्टेंबर मध्ये मोटो जी9 प्लस ब्राजीलमध्ये लॉन्च केला होता. या डिवाइसची किंमत R$ 249910 आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 6.8 इंचाचा एफएचडी प्लस मॅक्स विजन डिस्प्ले दिला आहे. जो एचडीआर 10 सपोर्ट करणार आहे. या फोनमध्ये Snapdragon 730G चिपसेटसह 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिला आहे.(Oppo A33: खुशखबर! ओपो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन 'ओपो ए 33' च्या किंमतीत मोठी घट)
या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 64MP चा प्रायमरी सेंसर, 8MP चा वाइड अँगल लेन्स, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेंसर मिळणार आहे. या फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. तसेच 5000mAh ची बॅटरी दिली गेली असून जी 30 वॅट TurboPower वर फास्ट चार्जिंग फिचर लेस आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये एनएफसी, ब्लुटुथ 5.0 वायफाय, युएसबी टाइप सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनी लेटेस्ट स्मार्टफोन मोटो जी9 प्लस
15 ते 20 हजार रुपयांच्या किंमतीमध्ये विक्री केला जाऊ शकतो.