मोबाईल धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! मोबाईल नंबर पोर्टेबल करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याचे निर्देश केंद्रीय दूरसंचार नियामक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत ग्राहकांची एमएनपी प्रक्रिया बंद राहणार आहे. लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत एमएनपीसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक पोट करण्यात येतील. त्यानंतर पुढील 6 दिवस ही सेवा पूर्णपणे बंद राहील.
मोबाईल नंबर पोर्टेबल करण्यासाठी नवीन प्रक्रिया लागू झाल्यानंतर 16 डिसेंबरपासून एमएनपी सुविधा ग्राहकांना मिळेल. नवीन प्रक्रियेनुसार, ग्राहकांना केवळ 2 दिवसांत एमएनपी सेवा मिळेल. अनेक मोबाईल धारकांना सिम कार्ड दुस-या कंपनीचे असले तरी त्यांचा मोबाईल नंबर बदलायचा नसतो कारण आपल्या व्यवसायात अनेक ठिकाणी त्यांना एकच नंबर ठेवायचा असतो. म्हणून ही पोर्टेबल सुविधा असते. मोबाईल नंबर तोच ठेवून सेवा पुरविणारी कंपनी बदलण्याबाबतचे नवीन नियम 16 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (TRAI) याबाबत माहिती दिली आहे. हेल्पलाईनच्या नावाखाली येणाऱ्या फोनबाबत सावधान, मिनिटांमध्ये खाली होईल बँक खाते
सध्या एमएनपी प्रक्रियेसाठी साधारणत: आठवडाभराचा कालावधी लागतो मात्र ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर हा वेळ अवघ्या 3 दिवसांवर येईल. मात्र जर ग्राहकाला दुस-या सर्कलमध्ये नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी 5 दिवसांचा कालावधी लागेल.
तसेच युनिक पोर्टिंग कोडची मुदत आता केवळ 4 दिवस राहील. जम्मू-काश्मीर, आसाम, ईशान्य भारतात मात्र ही मुदत सध्याप्रमाणे 30 दिवस राहील असे ट्रायने स्पष्ट केले आहे.