Micromax In Note 1 स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल, Flipkart दुपारी 12 वाजता होणार विक्रीसाठी उपलब्ध
Micromax In Note 1 (Photo Credits-Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन Micromax In Note 1 लाँच झाल्यानंतर आज त्याचा पहिला फ्लॅशसेल (FlashSale) होतोय. 26 नोव्हेंबरला या स्मार्टफोनचा पहिला फ्लॅशसेल आयोजित करण्यात आला होता. मात्र लॉजिस्टिक्समध्य काही अडचणी आल्याने हे तारीख लांबणीवर पडली. मात्र आज दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनचा पहिला स्मार्टफोन सुरु होईल. ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) हा फ्लॅशसेल होईल. त्याचबरोबर मायक्रोमॅक्सच्या अधिकृत साइटवर देखील विक्रीसाठी उपलब्ध होईल. यात 4GB+64GB आणि 4GB+128GB असे दोन वेरियंट देण्यात आले आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये आणि 12,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Micromax In Note 1 च्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, 6.67 इंचाचा पंच होल प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनच्या उत्तम परफॉर्मेन्ससाठी MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला आहे.

हेदेखील वाचा- Moto G 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या सर्वात स्वस्त 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

फोन अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड स्टॉक वर्जन ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमच्या रियर पॅनलवर क्वॉड कॅमेराग सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48mp असणार आहे. तर 5MP चा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. त्याचसोबत 2MP मॅक्रो लेन्स दिली आहे. तर डेप्थ सेंसरसाठी 2MP चा वापर केला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर 16MP चा कॅमेरा सेटअप मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळणार आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे.

या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, जीपीएस, ब्लुटुथ आणि युएसबी टाइप सी पोर्ट सारखे फिचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनची फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना American Express कार्डधारकांना यावर 5000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर Flipkart Axis Bank कार्डधारकांना 5% आणि Axis Bank Buzz कार्डधारकांना 10% चा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे.