Micromax IN 1b Online Sale आज दुपारी 12 पासून फ्लिपकार्टवर सुरु; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि ऑफर्स
Micromax IN 1b (Photo Credits: Micromax)

Micromax IN 1b स्मार्टफोनचा पहिला सेल भारतात आज पासून सुरु होत आहे. सेलची माहिती कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b स्मार्टफोन दोन आठवड्यांपूर्वी भारतात लॉन्च झाले होते. आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट (Flipkart) आणि micromaxinfo.com वर Micromax IN 1b स्मार्टफोनचा सेल सुरु होत आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरुन हा फोन खरेदी करताना 5% कॅशबॅक दिला जात आहे. तर अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवर देखील 5% कॅशबॅक मिळत आहे. तसंच नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) 778 रुपये प्रती महिना असा उपलब्ध आहे.

Micromax IN 1b मध्ये 6.52 इंचाचा एचडी+डिस्प्ले दिला आहे. तसंच यात MediaTek Helio G35 प्रोसेसर असून ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 13MP चा मेन कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर LED फॅल्शसह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ:

Micromax IN 1b (Photo Credits: Micromax)

या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 10W फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. तसंच कनेक्टीव्हीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth, GPS/A-GPS, USB Type-C port, 3.5mm हेडफोन जॅक आणि रिअर फिंगरप्रिंट स्नॅनर देण्यात आला आहे.

Micromax IN 1b (Photo Credits: Micromax)

हा स्मार्टफोन ग्रीन, ब्लू, पर्पल या तीन रंगात उपलब्ध आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये दोन वेरिएंट देण्यात आले आहेत. 2GB रॅम+ 32GB इंटरनल स्टोरेज आणि 4GB रॅम + 64GB इंटरनल स्टोरेज. Micromax IN 1b च्या 2GB & 32GB वेरिएंटची किंमत 6,999 इतकी असून 4GB & 64GB वेरिएंटची किंमत 7,999 इतकी आहे.