Wifi चा पासवर्ड न सांगता 'या' सोप्या पद्धतीने करा शेअर
WiFi (Representational Image)

आजकाल इंटरनेटची गरज फार प्रमाणात भासते. तसेच प्रवास किंवा ऑफिसला जाण्याची वेळ असो प्रत्येकजण मोबाईलवर गुंतलेला दिसून येतो. परंतु थोडावेळासाठी जर इंटरनेट सुविधा बंद पडल्यास करमेनासे होते. सध्या मोबाईल इंटरनेटस वायरलेस इंटनरेटच्या विविध सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखाद्याकडे वायफाय असल्यास त्याचे कनेक्शन मित्रमंडळी किंवा घरात आलेली पाहुणे मागताना दिसून येतात. परंतु वायफायला मोबाईल कनेक्ट करण्यासाठी पासवर्ड टाकणे अत्यावश्क असते. मात्र एकदा वायफायचा पासवर्ड एखाद्याला दिल्सास तो अजून दोनतीन जणांना सांगण्याची चिंता वाटते.

या प्रकारापासून वाचण्यासाठी तुम्ही वायफायचा पासवर्ड एखाद्याला न सांगता या सोप्या पद्धतीने शेअर करु शकता. या सोप्या पद्धतीचा वापर करण्यासाठी तुम्ही QR कोडचा वापर केल्यास तो अधिक सोपा असून कोणाला सहजासहजी कळणार नाही. यामुळे वायफायला कनेक्ट होण्याची प्रक्रिया वेगाने होईल आणि पासवर्डसुद्धा समोरच्या व्यक्तीला कळणार नाही. परंतु समोरचा व्यक्ती QR कोड स्कॅन करुन वायफायला कनेक्ट करु शकतात.('कॉल ड्रॉप' च्या समस्येपासून तुम्ही त्रस्त आहात? 'या' पद्धतीने करा तक्रार)

पुढील सोप्या पद्धतीने Wifi चा पासवर्ड न सांगता शेअर करा

-प्रथम www.qrstuff.com किंवा zxing.appspot.com/generator या संकेतस्थळावर जावे.

-Wifi Network किंवा Wifi Login हा ऑप्शन निवडावा.

-SSID सेक्शनमध्ये जाऊन Wifi नेटवर्क असे टाईप करावे.

-त्यानंतर डेडीकेटेड सेक्शन येथे जाऊन पासवर्ड टाईप करावा.

-नेटवर्क टाइप ऑप्शन निवडावा. मुख्यत्वे Wifi हे WPA नावाने दाखवले जाते.

-जनरेट येथे क्लिक करुन QR कोड डाऊनलोड करावा.

क्यू आर कोड डाऊनलोड झाल्यावर युजर्स त्याची एक सॉफ्ट कॉपी ठेवू शकतात. तसेच क्यू आर कोड स्कॅन केल्यावर वायफाय कनेक्ट होऊ शकते. आयफोन आणि काही अँन्ड्रॉइड युजर्स क्यू आर कोडच्या माध्यमातून वायफायला मोबाईल कनेक्ट करु शकतात. मात्र ज्या स्मार्टफोनममध्ये क्यू आर कोड फीचर नाही त्यांना प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येऊ शकतो.