जोफ्रा आर्चर ने सामाजिक संदेश देत पूर्ण केले Bottle Cap Challenge, पहा (Video)
जोफ्रा आर्चर (Photo Credit: Jofra Archer/ Twitter)

इंग्लंड (England) संघाचा नवा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) सध्या आपल्या प्रभावी खेळीसाठी जगभरात प्रसिद्ध झाला आहे. नुकतेच संपुष्टात आलेले आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आर्चर याने इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. विश्वचषकनंतर आता इंग्लंडची टीम अॅशेस (Ashes) मालिका खेळणार आहे. मैदानावरील आपल्या खेळी शिवाय आर्चर, मैदानबाहेरील कामगिरीने चाहत्यांची वाहवाही मिळवत आहे. अन्य काही क्रिकेटपटूंनसारखे आर्चरने देखील आपल्या 'बॉटल कॅप चॅलेंज' (Bottle Cap Challenge) चा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आर्चरचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना वेडच लागले आहे. (Bottle Cap Challenge: विश्वचषकातून बाहेर पडलेला शिखर धवन पुन्हा उभा राहिला; दुखापतीनंतर पहिल्यांदाच बॅट पकडत पूर्ण केले बॉटल कॅप चॅलेंज)

आर्चरने चॅलेंज पूर्ण करण्यासाठी कोका-कोलाच्या तीन बॉटलचा वापर केला. बॉल टाकून त्यातील एका बॉटलची कॅप उडवून दाखवली. महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने हे चॅलेंज पूर्ण करत लोकांना एक पर्यावरण संदेशही दिला आहे. प्लास्टिकची बॉटल रिसायकला करण्या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. आर्चरने या बॉटल्सच्या मागे कचऱ्याचा एक डब्बा ठेवला होता. आर्चरने बॉटलची कॅप उड़वल्यावर ती मागे ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्ब्यात जाऊन पडली. अशा अनोख्या पद्धतीनं जोफ्रानं बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण करून दाखवलंय. पहा हा व्हिडिओ:

सध्या सोशल मीडियावर बॉटल कॅपचा ट्रेंड सुरू आहे. सुरूवातीला हॉलिवूडमधल्या काही कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारलं. आणि आता तो ट्रेंड भारतात देखील आला. बॉलीवूड अभिनेता असो किंवा खेळाडू, प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. दुसरीकडे, विश्वचषकमधील उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आर्चरला आगामी अॅशेस मालिकांसाठी निवडण्यात आले आहे. आर्चरची इंग्लंडसाठी ही पहिली टेस्ट असणार आहे.