शिखर धवन (Photo Credit : Twitter)

सध्या सोशल मिडीयावर बॉटल कॅप चॅलेंज (Bottle Cap Challenge) बराच धुमाकूळ घालत आहे. सामान्य नागरिक, बॉलिवूडमधील मंडळी, अगदी खेळ विश्वातील अनेकांनी हे चॅलेंज लीलया पूर्ण करून दाखवून शाबासकी मिळवली आहे. आता शिखर धवनचे (Shikhar Dhawan) बॉटल कॅप चॅलेंज व्हायरल होत आहे. युवराज सिंह (Yuvraj Singh) ने स्वतः हे चॅलेंज पूर्ण करून पुढे ते शिखर धवन, क्रिस गेल आणि सचिन तेंडुलकर यांना आव्हान दिले होते. आता शिखरने हे आव्हान पूर्ण केले आहे.

पहा शिखर धवन चे बॉटल कॅप चॅलेंज -

याबाबत शिखर लिहितो. युवी पाजी मी हे चॅलेंज पूर्ण करत आहे. दुखापतीनंतर आज पहिल्यांदाच बॅट हातात घेतली आहे. परत सुरुवात करताना आंनद होत आहे. (हेही वाचा: ICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर शिखर धवन भावूक; चाहत्यांचे आभार मानत टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा)

दरम्यान, भारतीय सलामीवीर शिखर धवन यंदाच्या विश्वचषक 2019 स्पर्धेतून बाहेर पडला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. धवनला दुखापतीतून सावरायला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लागणार असल्याने त्याला भारतीय संघातून बाहेर केले गेले होते. त्यानंतर आता नेटमध्ये क्रिकेटचा सराव करताना त्याने बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण करून दाखवले आहे.