Jio कडून रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्याने नवे दर आजपासून देशभरात लागू
Reliance Jio (Photo Credit: Facebook)

रिलायन्स जिओ (Reliance Jio) कडून आजपासून (1 डिसेंबर) देशभरात त्यांच्या प्लॅनचे वाढलेले दर लागू केले जाणार आहेत. या प्लॅनमध्ये अधिकाधिक 480 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जिओकडून डेटा अॅड ऑनसह अनलिमिडेट प्लॅन आणि जिओफोन प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. तर एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांनी आपल्या रिचार्जच्या दरात सुद्धा वाढ केली आहे. वोडाफोन-आयडियाचे नवे दर 25 नोव्हेंबर तर एअरटेलचे दर 26 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आले आहेत. अशातच जिओने आपल्या प्लॅनमध्ये 21 टक्क्यांनी वाढ केली आहे.

रिलायन्स जिओकडून वर्षभराच्या प्लॅनमध्ये 480 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यासाठी ग्राहकांना 2879 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटासह अनलिमिडेट कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जाणार आहेत.(VI चे नवे प्लान आजपासून देशभरात लागू, जाणून घ्या अधिक)

जिओफोनच्या बेस प्लॅनसाठी आता 75 रुपयांऐवजी 91 रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये 3GB डेटा अनलिमिडेट कॉलिंग आणि 50 एसएमएस पाठवता येणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. त्याचसोबत जिओचा 129 रुपयांचा प्लॅन आता 155 रुपये करण्यात आला आहे. यामध्ये सुद्धा अनलिमिडेट कॉलिंगसह 300 एसएमएस मिळणार आहेत.

ग्राहकांना दररोज 1GB डेटासाठी कमीत कमी 149 रुपयांऐवजी 179 रुपये द्यावे लागणर आहेत. हा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह येणार आहे. यामध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली गेली आहे. जिओ ग्राहकांना डेली 2 जीबी डेटासाठी 249 रुपयांऐवजी 299 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 200 एसएमएस सुद्धा पाठवता येणार आहेत.

रिलायन्स डिओच्या डेटा अॅन ऑन प्लॅन्सची सुरुवाती किंमत 51 रुपयांऐवजी 61 रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये 6 जीबी डेटा दिला जाणार आहे. तर 121 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये 12 जीबी डेटा मिळणार आहे. तर जिओच्या 50 जीबी डेटा प्लॅनसाठी 301 रुपये मोजावे लागणार आहेत.