VI चे नवे प्लान आजपासून देशभरात लागू, जाणून घ्या अधिक
VIL | PC: File Image

वोडाफोन आयडिया (Vodafone-Idea) कंपनीने नवे टेरिफ प्लॅन लॉन्च केले आहेत. ते प्लॅन आजपासून देशभरातील युजर्ससाठी लागू केले जाणार आहेत. प्लॅनच्या किंमतीत कंपनीकडून वाढ करण्यात आली आहे. Vi कडून प्लॅनच्या किंमती 20-25 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. नवे प्रीपेड प्लॅनची सुरुवात 99 रुपयांपासून सुरु होणार असून 2399 रुपयांपर्यंत आहे.युजर्सला 219 रुपयांच्या प्लॅनवर अनलिमिटेड बेनिफिट्स जसे कॉलिंग आणि डेटा सारखी सुविधा दिली जाणार आहे. त्याचसोबत टेलिकॉम कंपनीकडून डेटा टॉप-अप प्लॅनच्या किंमतीत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. तर जाणून घ्या या बद्दल अधिक.

तर वोडाफोन-आयडिया कंपनीचा 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये तेवढ्याच किंमतीचा टॉकटाइम दिला जाणार आहे. त्याचसोबत 200MB डेटा सुद्धा मिळणार आहे. टॉकटाइम संपल्यानंतर 1 पैसे प्रति सेंकदानुसार चार्ज घेतला जाणार आहे.(Airtel युजर्सला महागाईचा झटका, प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत केली वाढ)

कंपनीचा 179 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 300SMS आणि अधिकाधिक 2GB डेटा मिळणार आहे. त्याचसोबत 269 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 1GB डेटाव्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा दिली जाणार आहे.(Android युजर्स व्हा सावध! 'हे' 151 Apps फोन मधून तातडीने करा डिलिट)

28 दिवसांची वॅलिडिटी असणारा 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5GB डेटा मिळणार आहे. त्याचसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS पाठवता येणार आहेत. तर कंपनीचा 359 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला डेली 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून डेली 100 SMS पाठवता येतील.