जर तुम्ही प्रत्येक महिन्याला रिचार्ज करण्याचा कंटाळा करत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे. कारण आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vi मधील काही निवडक प्रीपेड प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला 1.5 पेक्षा अधिक हाय-स्पीड डेटा, फ्री-कॉलिंगसह 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. तर जाणून घ्या रिचार्ज बद्दल अधिक.(Reliance Jio चा नवा प्लॅन: 1999 रुपयांत मिळणार कॉलिंग, डेटा आणि फोन अगदी मोफत)
रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला प्रतिदिन 3GB डेटा आणि 100SMS मिळणार आहेत. तसेच कोणत्याही अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तसेच डेटा प्लॅनसह जिओ टीव्ही, सिनेमा आणि न्यूज अॅपचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे.
एअरटेल कंपनीचा हा प्रीपेड प्लॅन अत्यंत शानदार आहे. यामध्ये युजर्सला डेली 2GB डेटा आणि 100SMS मिळणार आहेत. युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करता येणार आहे. तसेच रिचार्ज प्लॅनसह एअरटेल एक्सट्रीम, अॅमेझॉन प्राइम आणि विंक म्युझिकचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाणार आहे. त्याचसोबत युजर्सला फास्टॅग वर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याची वैधता 84 दिवसांची आहे.(मोबाईल फोनचा पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात? 'या' सोप्प्या स्टेप्स वापरुन करा अनलॉक)
या व्यतिरिक्त वोडाफोन-आयडिया युजर्स असाल तर प्रत्येक महिन्याचा रिचार्ज करण्यापासून तुमची सुटका होणार आहे. कंपनीचा 801 रुपयांचा रिचार्जमध्ये प्रतिदिन 3GB डेटा आणि 100SMS मिळणार आहे. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. त्याचसोबत तुम्हाला विकेंड डेटा रोलओवरची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्रीपेड प्लॅनसह डिझ्नी प्लस हॉटस्टारसह वीआय मुव्ही आणि लाइव टीव्हीचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. याची वैधता ही 84 दिवसांची आहे.