Jio, Airtel, Vi च्या 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला एक महिना अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार 'हे' फायदे
Jio, Airtel and Vodafone-idea (PC - Facebook)

टेलिकॉम कंपनीकडून विविध वॅलिडिटी असणारे काही प्री-पेड रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जात आहेत. मात्र जर तुम्ही एक महिन्याच्या वॅलिटीडीसह 4G रिचार्ज प्लॅन सर्च करत असाल तर अधिक डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा ही मिळणार आहे. तर 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन ठरु शकतो. या रिचार्ज प्लॅनवर विविध डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स युजर्सला जाणार आहेत.(Vi चा नवा 269 रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच, मिळणार 4GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा)

Reliance Jio च्या 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. या प्लॅनमध्ये अधिकाधिक 2GB प्रतिदिन डेटा ऑफर केला जाणार आहे. याच प्रकारे जिओच्या 28 दिवसांमध्ये एकूण 56GB हायस्पीड डेटा मिळणार आहे. प्रतिदिन डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64kbps होणार आहे. कॉलिंगसाठी नॉन-जिओ नेटवर्कवर 1000 FUP मिनिट्स मिळणार आहेत. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. या व्यतिरिक्त 100SMS मोफत सुविधा मिळणार आहे. त्याचसोबत जिओ अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन ही दिले जाणार आहे.

Vi च्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 1.5GB डेटा, सर्व नेटवर्कर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अॅपवर 5GB अधिक डेटा ऑफर केला जाणार आहे. हा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे.(Jio, Airtel आणि Vodafone-idea चे 'हे' आहेत सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान; पहा संपूर्ण लिस्ट)

Airtel चा 249 च्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. या प्लॅनमध्ये 42GB डेटा फायदा होणार आहे. लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग कोणत्याही नेटवर्कवर पूर्णपणे मोफत आणि अनलिमिटेड मिळणार आहे. या व्यतिरिक्त 100SMS प्रतिदिन दिले जाणार आहेत.