टेलिकॉम कंपनी वोडाफोन (Vodafone) आणि आयडिया (Idea) एकत्र आल्यानंतर त्यांच्या कंपनीचे नाव Vi असे झाले. Vi अनेक नवनवीन प्रीपेड प्लान्स (Prepaid Plan) देशात आणले आहेत. त्यातच आता एक नवीन प्लान लाँच केला आहे. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग आणि 4GB डाटाची सुविधा देण्यात आली आहे. हा प्लान 269 रुपयांचा असून किंमतीच्या बाबतीत आणि यात मिळणा-या सुविधांच्या बाबतीत हा प्लान Jio, Airtel, BSNL ला जबरदस्त टक्कर देईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्लानची वैधता देखील जास्त दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 56 दिवसांची अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.
Vi च्या या 269 रुपयांच्या प्लानमध्ये 56 दिवसांची वैधता मिळत आहे. त्याचबरोबर यात 4GB डाटा ची सुविधा देखील मिळत आहे. तसेच यात अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड मेसेजेस सुविधा मिळत आहे. हेदेखील वाचा- Vodafone Idea ग्राहकांना बसणार झटका, महागणार Tariff प्लॅन्स
याचाच अर्थ या प्लान मध्ये मिळणारा 4GB डाटा तुम्ही 56 दिवस वापरू शकता. यात तुम्हाला 600 SMS प्रति महिना अशी सुविधा मिळत आहे. थोडक्यात हा प्लान Vi ग्राहकांसाठी खूपच चांगला आहे. या बजेट प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला खूप सा-या सुविधा मिळत आहे.
दरम्यान Vi च्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले होते की, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ पूर्वी कंपनी टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ करु शकते. आतापर्यंत एअरटेल आणि जिओने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केलेली नाही. मात्र वोडाफोन आयडिया यांना काही आर्थिक दबावांचा सामना करावा लागत आहे. या व्यतिरिक्त सब्सक्राइबर्स सुद्धा कमी होत चालले आहेत. वोडाफोन आयडिया कंपनी याआधीपासून इंडस्ट्रीमध्ये समस्यांचा सामना करत आहे. ट्राय यांच्याकडून रिलीज करण्यात आलेल्या ऑगस्ट 2020 च्या सब्सक्रिप्शन डेटावरुन हे कळून येते की, कंपनीचे 10 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स कमी झाले आहेत.