JIO ची भन्नाट ऑफर! 10 रुपयात मिळणार 1 जीबी डेटा आणि कॉलिंग
Reliance Jio | (File Image)

आपल्या आकर्षक प्लान्समुळे टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री (Telecommunictaions Industry) मध्ये अग्रगण्य ठरलेल्या जिओ (JIO) ने आपल्या ग्राहकांसाठी एक सर्वात स्वस्त आणि भन्नाट ऑफर्सचा प्लॅन मार्केट मध्ये आणला आहे. निव्वळ 10 रुपये मोजून या पुढे ग्राहकांना 124   कॉलिंग मिनिट्स मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर दर 10 रुपयांच्या रिचार्जमध्ये एक जीबी डेटा सुद्धा देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी जिओने आपल्या प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करताना जिओ शिवाय अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा बंद केली होती. यानंतर रिचार्जनुसार अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन जिओ मिनिट्स देण्यात येतात.Jio ने आणला सर्वात स्वस्त प्लान; 125 रुपयांत अनलिमिटेड कॉल्स आणि बरेच काही, वाचा सविस्तर

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये जिओने IUC चार्ज आकारण्या सुरुवात केली होती. यानुसार अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट आकारण्यात येऊ लागले आहेत. मात्र ग्राहकांना तरीही धरून ठेवण्यासाठी जिओने प्रीपेड प्लॅन मध्ये अनेक सवलती द्यायला सुरुवात केली आहे. यातच एक भाग म्हणजे नॉन जिओ मिनिट्स देण्यास सुरुवात केली. जवळपास सगळ्याच प्रीपेड प्लानमध्ये जिओकडून नॉन जिओ मिनिट्स देण्यात येतात.

दरम्यान, सध्या मार्केट मध्ये जिओचे 20, 50, 100, 500 आणि 1 हजार रुपयांचे टॉपअप वाउचर देखील उपलब्ध आहेत.