आपल्या आकर्षक प्लान्समुळे नेहमी ग्राहकांना आकर्षित करणा-या टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio) ने एक नवा आणि स्वस्त प्लान आणला आहे, ज्यात 125 रुपयात तुम्हाला महिन्याभरासाठी मोफत कॉलिंग आणि 14GB डेटा मिळणार आहे. तसं पाहायला गेलं तर भारतातील अन्य टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एकाहून एक सरस अशा ऑफर्स ठेवत आहे. त्यामुळे जिओनेही हा अफलातून आणि स्वस्त प्लान आणून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत.
जिओ ने दिलेल्या 125 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सेवाही देण्यात आली आहे. त्यासोबत 14GB डेटा ही दिला आहे. 125 रुपयांच्या प्लॅनची मुदत 28 दिवस असणार आहे. यात दररोज 0.5 जीबी असा 14 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. याशिवाय 300 एसएमस फ्री मिळतील. Reliance JioFiber युजर्सला झटका, 90 टक्क्यांपर्यंत इंटरनेटच्या स्पीडमध्ये घट
कंपनीने जिओ टू जिओ फ्री कॉलिंग दिले आहे. तसेच इतर नेटवर्कसाठी 500 मिनिटे दिली आहेत. हा प्लॅन फक्त जिओ फोनसाठी असणार आहे.
कॉलिंग, इंटरनेट डेटाशिवाय जिओ म्युझिक, मूव्ही आणि इतर अॅप्सचा अॅक्सेस फ्री असणार आहे. टेलिकॉम कंपन्यांनी आययुसी (IUC) भरण्याच्या कारणामुळे गेल्या महिन्यात युजर्सला झटका दिला. त्यानंतर पुन्हा रिलायन्स जिओकडून युजर्सला धक्का देण्यात आला असून त्यांच्या 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वॅलिडिटी कमी करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला यापूर्वी 28 दिवसांची वॅलिडिटी देण्यात येत होती. मात्र आता त्याची वॅलिडिटी 24 दिवस करण्यात आली आहे.