iQoo3 (Photo Credits-Twitter)

भारतात सर्वाधिक बेस्ट स्मार्टफोन म्हणून ओखळ असणाऱ्या iQOO 3 स्मार्टफोनवर ग्राहकांना सूट देण्यात येत आहे. चीनची कंपनी वीवो चा हा सबब्रँड असून iQOO 3 वर ग्राहकांना तब्बल 3 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीची ही ऑफर 19 मे ते 15 जून पर्यंत सुरु राहणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, 55W सुपर फास्ट चार्जिंग सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन दोन रंगात म्हणजेच सिल्वर आणि ब्लॅक रंगात उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

iQOO 3 स्मार्टफोनच्या 8GG+128GB मॉडेलची किंमत 34,900 रुपये, 8GB+256 GB मॉडेलची किंमत 37,990 रुपये आणि 12GB+256GB मॉडेलची किंमत 44,900 रुपये आहे. परंतु या मॉडेल्सवर डिस्काउंट दिल्यानंतर त्यांची किंमत क्रमश: 31,900 रुपये, 34,990 रुपये आणि 41,990 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. मात्र ICICI क्रेडिट कार्ड असणाऱ्या ग्राहकांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.(Mitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अ‍ॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide Video)

स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल HD+एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रेजॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आणि टच रिस्पॉन्स रेट 180Hz आहे. डिस्प्लेमध्ये पंच-होल कॅमेरा आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. फोन 2.84 GHz ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेटसह येणार आहे. स्मार्टफोनमध्ये 4440mAh ची बॅटरी 55W सुपर फास्ट चार्जिंगसह येणार आहे.(Vivo Y70s 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

 कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये 48MP+13MP+13MP+2Mp चा क्वाड रिअर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 650 GPU मिळणार असून जे गेमिंग परफॉर्मेंस अधिक उत्तम बनवण्यास मदत करणार आहे. तसेच गेमिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये साइडफ्रेमच्या येथे दोन टच सेंसिटिव्ह बटन्स, अल्ट्रा गेम मोड आणि मल्टी टर्बो मोड देण्यात आले आहेत.