गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर टिकटॉक (TikTok) या शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप संदर्भात बरीच चर्चा सुरू आहे. वादग्रस्त आणि शंकास्पद कंटेंट या अॅपद्वारे व्हायरल होत असल्याने, बर्याच लोकांनी या अॅपवर बंदी घालण्याचे आवाहन केले. तसेही टिकटॉक हे एक चायनीज अॅप असल्याने त्याप्रकारेही लोकांचा रोष आहेच. मात्र तुम्हाला माहित आहे का की, प्ले स्टोअरवर (Play Store) असेच व्हिडिओ बनवण्याचे एक अॅप उपलब्ध आहे आणि जे पूर्णतः भारतीय आहे. होय, टिकटॉक सारखेच शोर्ट व्हिडिओ मेकिंग मित्रों अॅप (Mitron App) प्ले स्टोअरवर आहे, जे सध्या धुमाकूळ घालत आहे.
अगदी सहज हाताळण्याजोगा यूजर इंटरफेससह असल्याने मित्रों हे अॅप सध्या लोकप्रिय ठरत आहे. रिपोर्टनुसार, मित्रोंची रचना आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्याने केली आहे. एका महिन्यातच, हे अॅप 5 दशलक्षांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे आणि Google Play Store वरील उत्कृष्ट अॅप मध्ये याचा समावेश झाला आहे. कदाचित, संपूर्ण युट्युब विरुद्ध टिकटॉक विवाद आणि त्यानंतर टिकटॉक वरील बंदीची मागणी सध्या मित्रोंला फायदेशीर ठरत आहे. जर का आपणही हे मित्रों अॅप वापरणार असाल तर याची स्टेप बाय स्टेप माहिती आम्ही सांगत आहोत.
मित्रों हे अॅप कसे वापरावे?
> प्ले स्टोअर वर जा आणि मित्रों अॅप सर्च करा. आपणास MitronTV अॅप मिळेल, जे डाउनलोड करा.
> अॅप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करा, त्यानंतर तुम्हाला अन्य वापरकर्त्यांद्वारे तयार केलेले व्हिडिओ दिसतील. एकदा त्याच्यावर नजर टाका.
> जर यातील एखादा व्हिडिओ तुम्हास आवडल्यास तुम्ही ‘हर्ट’ चिन्हावर क्लिक करू शकता, त्याचप्रमाणे कमेंट डायलॉग बॉक्सवर क्लिक करुन त्या व्हिडिओवर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता.
> आपणाला जर का आपले स्वतःचे व्हिडिओ तयार करून ते अपलोड करायचे असतील तर त्यासाठी नोंदणी करावी लागेल.
> नोंदणी करण्यासाठी, खाली कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल पर्यायावर क्लिक करा. आपल्याला आपले क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करण्याचा एक पर्याय मिळेल. तिथे आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करा. आपण फेसबुकद्वारेही लॉग इन करू शकता.
> एकदा का तुम्ही तुमचे खाते तयार करून साइन इन केले की, तुम्ही तुमचा प्रोफायल फोटोही बदलू शकता. (हेही वाचा: Internet Speed चा विश्वविक्रम; अवघ्या 1 सेकंदात 1000 पेक्षा जास्त HD फिल्म्स झाल्या डाऊनलोड, जाणून घ्या काय आहे स्पीड)
> व्हिडिओ बटणावर क्लिक करून आपण व्हिडिओ बनविणे सुरु करू शकता. व्हिडिओमध्ये साउंड समाविष्ट करण्यासाठी वर एक बटन आहे. यामध्ये काही डीफॉल्ट आवाज आहेत. अशाप्रकारे आपण व्हिडिओ शूट केल्यावर तो सहज पोस्टही करू शकता.
दरम्यान, जर आपण आधी टिकटॉक वापरले असेल तर मित्रों अॅप वापरणे अतिशय सोपे आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्हाला नोंदणी करायची गरज नाही.