Vivo Y70s 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
Vivo Y70s 5G Smartphone Launched (Photo Credits: Vivo)

चायनीज स्मार्टफोन कंपनी विवोने Y सिरीजमधील Vivo Y70s हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. लॉन्चनंतर Vivo Y70s या स्मार्टफोनची पोस्टर इमेज ऑनलाईन पाहायला मिळत असून त्यात स्मार्टफोनचा लूक जवळून पाहायला मिळत आहे. यात Hole-Punch डिस्प्ले देण्यात आला असून ट्रिपल कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी असून 48MP चा मेन कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे- फॉग इल्यूजन (Fog Illusion), स्टारलाईट ब्लू (Starlight Blue) आणि मून शेडो ब्लॅक (Moon Shadow Black). मात्र हा स्मार्टफोन जगभरात आणि भारतात नेमका कधी उपलब्ध होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. (चीनी स्मार्टफोन ओप्पो चा Oppo Find X2 Neo 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

Vivo Y70s 5G च्या 6GB RAM + 128GB वेरिएंटची किंमत RMB 1,998 आहे म्हणजेच 21,200 रुपये. 8GB RAM + 128GB च्या वेरिएंटची किंमत RMB 2,198 म्हणजेच 23,400 रुपये. या स्मार्टफोनच्या ऑनलाईन ऑर्डर्स सुरु झाल्या आहेत आणि 1 जूनपासून याच्या डिलिव्हरीला सुरुवात होईल.

Vivo Y70s 5G Smartphone Launched (Photo Credits: Vivo)

या स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि IPS LCD स्क्रिन देण्यात आलेली आहे. याचा रेशो 19.5:9 इतका आहे. तर रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल इतके आहे. Vivo Y70s मध्ये सॅमसंगची Exynos 880 चिपसेट असून दोन Cortex-A77 कोर आहेत आणि त्यांचा क्लॉक स्पीड 2GHz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये अॅनरॉईड 10 व्हर्जन असून फनटच ओएस 10 ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. यात 4,500 mAh बॅटरी असून 18W ची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

यात ट्रिपल कॅमेर असून 48MP चा प्रायमरी सेन्सर आहे. तसंच 8MP ची अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. 16MP चा फ्रंट कमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी देण्यात आला आहे.