Oppo Find X2 Neo (PC - Twitter)

चीनी स्मार्टफोन (Chinese Smartphone) मोबाईल कंपनी (Mobile Company) ओप्पोने Oppo Find X2 Neo हा 5G स्मार्टफोन (Smartphone) सध्या जर्मनीमध्ये (Germany) लाँच केला आहे. ओप्पोने जर्मनीमध्ये 699 युरोना हा स्मार्टफोन लाँच केला आहे. भारतात याची किंमत 58000 रुपये एवढी आहे. अद्याप ओप्पोने भारताता या फोनच्या लाँचिंगबाबत कोणताही खुलासा केला नाही. परंतु, लवकरच हा स्मार्टफोन भारतातही लाँच होण्याची शक्यता आहे.

Oppo Find X2 Neo हा स्मार्टफोन 5G असल्याने त्याची किंमत थोडी जास्त आहे. परंतु, 2021 पर्यंत 5G नेटवर्क सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे वाढत्या तंत्रज्ञानासोबत हा स्मार्टफोन तुम्हाला नक्की फायदेशीर ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सिंगल सिम असणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. (हेही वाचा - Realme Narzo 10A चा सेल फ्लिपकार्ट आणि Realme.com वर सुरु; पहा किंमत आणि फिचर्स)

ओप्पोच्या या स्मार्टफोनला 4025 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये VOOC फ्लॅश चार्ज 4.0 देण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफीसाठी मोबाईलमध्ये क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे. यातील पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर 13 एमपीचा टेलिफोटो कॅमेरा, 8 एमपीचा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 एमपीचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फासाठी 32 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडी आहे. यात भारताच्या अर्थव्यवस्थेचाही समावेश आहे. जगभरात 51 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमण झालं असून 3 लाख 32 हजार पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील सर्वचं क्षेत्राचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे. अशात काही मोबाईल कंपन्या सध्या कोरोना संकट टळण्यानंतरचे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहेत. 2021 मध्ये जगभरात 5G नेटवर्क सेवा सुरू होणार आहे. या सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी ओप्पोने 5G सुविधा स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून दिली आहे.