Realme Narzo 10A Sale (Photo Credits: Realme India)

चायनीज स्मार्टफोन कंपनीचा Realme's Narzo 10A या स्मार्टफोनचा सेल आजपासून भारतात सुरु होत आहे. या सेलचा लाभ ग्राहकांना फ्लिपकार्ट आणि Realme.com वर घेता येणार आहे. या अंतर्गत स्मार्टफोनवर चांगल्या ऑफर्स दिल्या जात आहेत. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड (Axis Bank Credit Card) वरुन खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळत आहे. तर अॅक्सिस बॅंकेच्या बझ क्रेडिट कार्ड (Axis Bank Buzz Credit Card) वरुन खरेदी केल्यास 5% सवलत मिलत आहे. त्याचबरोबर एक्सचेंज आणि नो कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) हे पर्याय देखील उपलब्ध आहेत. या मोबाईलमध्ये MediaTek Helio G70 चिपसेटचा प्रोसेसर असून ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच यात मोठ्या डिस्प्लेसह अधिक क्षमतेची बॅटरी आहे.

हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे- ब्लू आणि व्हाईट. तसंच हा स्मार्टफोन ऑफलाईन देखील उपलब्ध आहे. तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि केरळ या ठराविक भागात हा स्मार्टफोन ऑफलाईन देखील खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी डिस्ल्पे देण्यात आला आहे. त्याचे रिजोल्यूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. तसंच यात गोरिल्ला ग्लास 3 चा वापर करण्यात आला आहे. तसंच MediaTek Helio G70 प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी असून 10W चा रेग्युलर चार्जर देण्यात आला आहे.

Narzo 10A स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 12MP चा प्रायमरी शूटर, 2MP Portrait Lens आणि 2MP Macro Lens असे कॅमेरे आहेत. तर 5MPचा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 3GB RAM + 32GB या इंटरनल स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला. याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, GPS, WI-Fi, Bluetooth 5. 0 आणि इतर सेन्सर्स देण्यात आले आहेत. Realme Narzo 10A या स्मार्टफोनच्या 3GB आणि 32GB व्हेरिंएटची किंमत 8,499 असून तो फ्लिपकार्ट आणि Realme.com वरुन खरेदी करु शकता.