जगातील प्रसिद्ध आयफोन (iPhone) कंपनी त्यांच्या स्मार्टफोनसाठी बदलत्या काळानुसार फिचर्स युजर्सला उपलब्ध करुन देत असते. त्याचसोबत आयफोन मधून क्लिक केलेल्या युजर्सचा फोटो जाहिरात म्हणून बऱ्याच वेळा आपल्याला रस्त्याच्याकडेला लागणाऱ्या मोठ्या होर्डिंगर्सवर पाहायला मिळतो. तर आयफोन फोटोग्राफी स्पर्धेत दोन भारतीय तरुणांची वर्णी लागली आहे.
या दोघांच्या फोटोला अवॉर्ड विनिंग फोटो म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.
महाराष्ट्रामधील डिम्पी भलोतिया (Dimpy Bhalotia) हिला आयफोनच्या सीरिज श्रेणीमधील दुसरे स्थान मिळाले आहे. कर्नाटक मधील श्रीकुमार कृष्णन (Sreekumar Krishnan) याला सनसेट श्रेणीमधील प्रथम स्थान मिळाले आहे. या दोघांनी आयफोनच्या फोटोग्राफी स्पर्धेत मान पटकावत भारताचे नाव त्यामध्ये सामील केले आहे. तर कृष्णन याने काढलेला फोटो हा आयफोनच्या सीरिजमधील 6 एसच्या सहाय्याने क्लिक केला आहे.
या स्पर्धेत 'फोटोग्राफर ऑफ द इअर' म्हणून इटलीच्या गॅब्रिएला सिगिलिआनो यांना पुरस्कार देण्यात आला आहे. तर पोर्तुगाल मधील डियोगो लेज याला 'सी स्ट्रिप्स' यासाठी आणि रशिया मधील युलिया इब्रेवाला 'सॉरी' या फोटोसाठी पुरस्कार देण्यात आला आहे.