काय सांगता? iPhone 11 Pro ची कमाल; रशियन बुलेटपासून केले युक्रेनियन सैनिकाचे रक्षण, जाणून घ्या सविस्तर (Watch Video)
iPhone 11 Pro (Photo Credits-Twitter)

ऍपल वॉचने (Apple Watch) युजर्सचे प्राण वाचवल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. आता असाच एक किस्सा पुन्हा समोर आला आहे, ज्यात आयफोनने (iPhone) एका युक्रेनियन सैनिकाचा जीव वाचवला आहे. ऐकायला थोडे विचित्र आहे मात्र हे सत्य आहे. रेडीत थ्रेड (Reddit) नुसार, आयफोन 11 प्रो (iPhone 11 Pro) ने या युक्रेनियन सैनिकाचे प्राण वाचवले. या थ्रेडमध्ये एक व्हिडिओ दिसत आहे, ज्यामध्ये एक सैनिक त्याच्या बॅगमधून खराब झालेला iPhone 11 Pro काढताना दिसत आहे.

या फोनमध्ये एक बुलेटही अडकली आहे. ही बुलेट आयफोन 11 प्रो मध्ये लागली नसती, तर सैनिकाचा मृत्यू झाला असता असे बोलले जात आहे. मात्र, या थ्रेडमध्ये घटनेचा तपशील देण्यात आलेला नाही. जर आयफोन 11 प्रो बॅगेत नसता आणि बुलेट लागली असती, तर कदाचित या सैनिकाचा मृत्यू झाला असता. परंतु ही बुलेट आयफोन 11 प्रोला लागली व त्यामुळे सैनिकाचे प्राण वाचले. हा व्हिडिओ युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा असल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी रशियन सैन्याने युक्रेनच्या दक्षिणेकडील निकोपोल शहरावर गोळीबार केला. युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले की, यामुळे ढिगाऱ्याखाली दोन जण जखमी झाले असून दोन जण गाडले गेले आहेत. (हेही वाचा: Bullet Train to Moon: आता पृथ्वीवरून चंद्रापर्यंत धावणार बुलेट ट्रेन; जपान करत आहे महाप्रकल्पावर काम)

दरम्यान, आयफोन 11 प्रो हे 3 वर्ष जुने आयफोन मॉडेल आहे, जे iPhone 11, iPhone XR आणि iPhone 11 Pro Max सोबत लॉन्च करण्यात आले होते. तेव्हापासून, इतर अनेक आयफोन मॉडेल भारतात आणि जगभरात सादर करण्यात आले आहेत. कॅमेरा आणि इतर फिचर व्यतिरिक्त, आयफोन त्याच्या बिल्ड क्वालिटीसाठी ओळखला जातो. कदाचित म्हणूनच या फोनमुळे आज एका सैनिकाचे प्राण वाचले आहेत.