दोनशे रुपयांपेक्षाही कमी किंमतीत इंटरनेट डेटा: तुमची कंपनी कोणती? Reliance Jio, Airtel, Vodafone, Idea?
Reliance Jio, Airtel, Vodafone, Idea | (Photo courtesy: archived, edited images)

Internet Data Pack at Less Than Two Hundred Rupees: रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यापासून या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा पाहायला मिळत आहे. ग्राहकांना आकर्शित करण्यासाठी या कंपन्या ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पाढत आहेत. आता तर 4G नेटवर्क आल्यापासून ही स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे. टेलिकॉम क्षेत्रातील जवळपास सर्वच खासगी कंपन्या अत्यंत कमी दरांमध्ये डेटा पॅक देत आहेत. ग्राहकांना सर्वात कमी किमतीत डेटा देण्याचे पहिले श्रेय Reliance Jio ला जाते. त्यानंतच वोडाफोन (Vodafone), आयडिया (Idea), एअरटेल (Airtel) यांसारख्या खासगी कंपन्यांनी आपल्या डेटा पॅक दरात कपात करत ते ग्राहकांना अत्यंत स्वस्त किमतीत उपलब्ध केले. आज आम्ही आपल्याला विविध कंपन्यांच्या असा 10 प्लॅनबद्धल सांगणार आहोत. हे प्लॅन 500 रुपयांपेक्षा कमी किंमती मध्ये उपलब्ध आहेत. तर घ्या जाणून असे कोणते प्लॅन आहेत. जे तुम्हालाही फायदेशीर ठरु शकतात.

200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध असलेले डेटा पॅक खालील प्रमाणे

कंपनीचे नाव

डेटा प्लॅन डेटा प्रकार वैधता डेटा किंमत

एअरटेल

1.5 GB 4 G 28 दिवस

199 रुपये

वोडाफोन

1.5 GB 4 G 28 दिवस

199 रुपये

आयडिया

1.5 GB 4 G 28 दिवस

199 रुपये

रिलायन्स जिओ 1.5 GB 4 G 28 दिवस 149 रुपये

(हेही वाचा, सावधान! Whatsapp Bug मुळे डिलीट होतोय डेटा? सुरक्षेसाठी वापारा हा पर्याय)

व्यवसायातील स्पर्धेमुळे टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या दरांमध्ये डेटा पॅकचे दर इतके कमी केले आहेत की ग्राहकांनाही आश्चर्य वाटत आहे. कारण 28 दिवसांच्या वैधतेसह या कंपन्या जेवढा डेटा पॅक दिवसाला देतात तेवढ्याच किमतीत हा डेटापॅक याच कंपन्या एकेकाळी प्रती महिना देत असत. उदाहरणच द्यायचे तर, एअरटेल ही कंपनी 199 रुपयांना प्रतिदिन 1.5 GB डेटा देत आहे. तर, हीच कंपनी एकेकाळी 1.5 GB डेटा 199 रुपयांपेक्षाही अधिक दराने 28  दिवसांच्या वैधतेसह (म्हणजेच प्रतिमहिना दराने) देत होती. त्यामुळे कंपन्यांतील या स्पर्धेचा आता ग्राहकांना चांगलाच फायदा होताना दिसतो आहे.