आयटी कंपन्या (IT Companies) दरवर्षी लाखोंच्या संख्येने अभियांत्रिकी पदवीधरांची भरती करतात. भारतात दरवर्षी सुमारे 15 लाख अभियांत्रिकी पदवीधर बाहेर पडतात. यापैकी 20-25 टक्के भरती आयटी कंपन्यांकडून केली जाते. पण अमेरिकेतील मंदीच्या भीतीने कंपन्या आता नवीन लोकांना कामावर घेण्यास कमी करण्याचा विचार करत आहेत. त्याचा परिणाम इन्फोसिसच्या (Infosys) निर्णयावर दिसून येत आहे.
भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसमधून या वर्षी उत्तीर्ण झालेल्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी एक वाईट बातमी आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, इन्फोसिसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, कंपनीचे सीएफओ निलांजन रॉय म्हणाले की, कंपनी सध्या नवीन कॅम्पस हायरिंगचा विचार करत नाही. परंतु ते प्रत्येक तिमाहीत त्याचे पुनरावलोकन करेल.
कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 3.2% ने वाढून 6021 कोटी झाला आहे. आयटी कंपनीने प्रति इक्विटी शेअर 18 रुपये लाभांश देखील जाहीर केला आहे. तिमाही आधारावर, कंपनीने एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत जुलै-सप्टेंबरमध्ये निव्वळ नफ्यात 4.5% वाढ आणि महसुलात 2.8% वाढ नोंदवली.
मागील तिमाही निकालात (Q1 FY2023-24), कंपनीने वर्षभराच्या आधारावर निव्वळ नफ्यात 10.9 टक्के वाढ नोंदवली आहे. तेव्हा त्याचा नफा 5,945 कोटी रुपये होता. एप्रिल-जून 2023 दरम्यान, उत्पन्न 10 टक्क्यांनी वाढून 37,933 कोटी रुपये झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 34,470 कोटी रुपये होते. (हेही वाचा: Retail Inflation Data: सणासुदीच्या दिवसांपूर्वी सर्वसामान्यांना महागाईबाबत मोठा दिलासा; सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई कमी होऊन 5 टक्क्यांवर)
दरम्यान, गेल्या वर्षी इन्फोसिसने 50,000 फ्रेशर्सना कामावर घेतले होते. कंपनी त्यांना एआय (AI) वर प्रशिक्षण देत आहोत. मात्र कंपनीने सांगितले आहे की ते सध्या तरी कॅम्पसमध्ये जाणार नाहीत. भविष्यातील अंदाज लक्षात घेता आम्ही प्रत्येक तिमाहीत याचे निरीक्षण करून कंपनी पुढील निर्णय घेईल.